जिल्ह्यात काेराेना रुग्णांचा टक्का वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:09 AM2021-03-15T04:09:25+5:302021-03-15T04:09:25+5:30
सावनेर/कळमेश्वर/कामठी/हिंगणा/रामटेक/काटाेल : नागपूर जिल्ह्यातील काेराेना रुग्णांनी रविवारी (दि. १४) उचल घेतली आहे. सर्वाधिक ७१ रुग्णांची नाेंद सावनेर तालुक्यात करण्यात ...
सावनेर/कळमेश्वर/कामठी/हिंगणा/रामटेक/काटाेल : नागपूर जिल्ह्यातील काेराेना रुग्णांनी रविवारी (दि. १४) उचल घेतली आहे. सर्वाधिक ७१ रुग्णांची नाेंद सावनेर तालुक्यात करण्यात आली असून, कळमेश्वर तालुक्यात ४२, कामठी तालुक्यात ३८, हिंगणा तालुक्यात ३२, रामटेक तालुक्यात २४ तर काटाेल तालुक्यात १२ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. काेराेनाचे वाढते संक्रमण विचारात घेता, नागरिकांनी काळजी घेणे व प्रतिबंधात्मक उपाययाेजनांचे पालन करणे गरजेचे झाले आहे.
सावनेर तालुक्यात सर्वाधिक ७१ रुग्ण आढळून आल्याने तालुक्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये २५ रुग्ण सावनेर शहरातील तर ४६ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. ग्रामीण भागातील रुग्णांमध्ये खापा शहरातील ९, परसाेडी येथील ५, पटकाखेडी, मंगसा, पाटणसावंगी, वाकोडी, बडेगाव व वाकी येथील प्रत्येकी ३, भागेमाहरी येथील २ आणि नांदोरी, आजनी, निमतलाई, दहेगाव (रंगारी), वेकोली (सावनेर), उमरी, खुर्सापार, करंभाड, वाकोडी व नांदा येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
सावनेरसाेबतच कळमेश्वर तालुक्यातील काेराेना रुग्णांमध्ये वाढ झाली असून, तालुक्यात रविवारी ४२ नवीन रुग्णांची नाेंद करण्यात आली. नव्याने पाॅझिटिव्ह आढळून आलेल्या काेराेना रुग्णांमध्ये कळमेश्वर-ब्राह्यणी शहरातील तीन तर तालुक्यातील धापेवाडा येथील २२, वरोडा व सोनपूर येथील प्रत्येकी ५, तेलगाव व झिल्पी येथील प्रत्येकी दाेन तर मडासावंगी, झुनकी, सावळी (बु.) येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
काेराेना संक्रमणामध्ये कामठी तालुकाही मागे राहिला नाही. या तालुक्यात रविवारी ३८ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील काही गावांची हाॅटस्पाॅटकडे वाटचाल सुरू झाली आहे. नव्याने आढळून आलेल्या काेराेनाबाधितांमध्ये कामठी शहरातील नऊ रुग्णांसह तालुक्यातील पांजरा (काेराडी) व काेराडी येथील प्रत्येकी आठ, महादुला येथील सहा, रनाळा येथील तीन आणि गादा, येरखेडा, वडोदा व वारेगाव प्रत्येकी एक रुग्ण आहे.