नागपूर जिल्ह्यात ‘प्रावीण्य’ श्रेणीतील विद्यार्थी ३३ टक्क्यांनी घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 09:12 PM2019-05-28T21:12:52+5:302019-05-28T21:14:47+5:30
बारावीच्या निकालात यंदा प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या नागपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा आकडा घटला आहे. विभागीय मंडळाच्या आकडेवारीनुसार यंदा नागपूर विभागात ६ हजार ९०१ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत प्रावीण्य श्रेणीतील विद्यार्थ्यांमध्ये ३३ टक्क्यांची घट झाली आहे. एकूण परीक्षार्थ्यांचा विचार केला तर केवळ ४ टक्के विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बारावीच्या निकालात यंदा प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या नागपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा आकडा घटला आहे. विभागीय मंडळाच्या आकडेवारीनुसार यंदा नागपूर विभागात ६ हजार ९०१ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत प्रावीण्य श्रेणीतील विद्यार्थ्यांमध्ये ३३ टक्क्यांची घट झाली आहे. एकूण परीक्षार्थ्यांचा विचार केला तर केवळ ४ टक्के विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
नागपूर विभागात एकूण १ लाख ५८ हजार ३१९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील १ लाख ३० हजार ६३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण परीक्षार्थ्यांपैकी ३५ हजार ६६२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत आले आहेत. यांची टक्केवारी २२.३८ टक्के इतकी आहे. तर द्वितीय श्रेणीत ८० हजार २४७ म्हणजेच ५०.६८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्वाधिक विद्यार्थी याच श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. मागील वर्षी प्रावीण्य श्रेणीत १० हजार ३०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. यंदा हा आकडा घटला आहे.
श्रेणीनिहाय उत्तीर्ण विद्यार्थी
श्रेणी उत्तीर्ण टक्केवारी
प्रावीण्य ४.३६
प्रथम २२.३८
द्वितीय ५०.६८
तृतीय ५.०७
अनुत्तीर्ण १७.४९