मुलींमध्ये पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोमचे प्रमाण ४० टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 09:02 PM2017-12-05T21:02:13+5:302017-12-05T21:09:23+5:30

वर्तमानातील वाढत्या तणावांमुळे आजच्या पिढीतील २० ते २५ या वयोगटातील मुलींची या ना त्या कारणाने पाळी अनियमित झाली आहे. अनेक जणींची पाळी तर १५ दिवस आधी येते वा सहा-सहा महिने येत नाही. यालाच वैद्यकीय भाषेत ‘पीसीओडी’ (पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम) म्हणतात. याचे प्रमाण ३२ ते ४० टक्के आहे.

The percentage of polycystic ovary syndrome among girls is 40% | मुलींमध्ये पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोमचे प्रमाण ४० टक्के

मुलींमध्ये पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोमचे प्रमाण ४० टक्के

Next
ठळक मुद्देडॉ. लक्ष्मी श्रीखंडे यांची पत्रपरिषदेत माहितीवंध्यत्व निवारण कार्यशाळा शनिवारपासून

आॅनलाईन लोकमत
नागपूर : वर्तमानातील वाढत्या तणावांमुळे आजच्या पिढीतील २० ते २५ या वयोगटातील मुलींची या ना त्या कारणाने पाळी अनियमित झाली आहे. अनेक जणींची पाळी तर १५ दिवस आधी येते वा सहा-सहा महिने येत नाही. यालाच वैद्यकीय भाषेत ‘पीसीओडी’ (पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम) म्हणतात. याचे प्रमाण ३२ ते ४० टक्के आहे. त्यातही समस्या नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर उपचार घेण्यास आलेल्या मुलींचे प्रमाण अधिक आहे, अशी माहिती स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ डॉ. लक्ष्मी श्रीखंडे यांनी दिली.
९ व १० डिसेंबर रोजी स्त्रीरोग तज्ज्ञांमधील वंध्यत्व निवारण चिकित्सेसंबंधी ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी ‘मास्टर क्लास इन्फर्टीलिटी-३’ या वंध्यत्व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रपरिषदेत त्या बोलत होत्या.
डॉ. श्रीखंडे म्हणाल्या, पाळी अनियमित येणे या ‘पीसीओडी’तील प्रमुख लक्षणाचा गर्भधारणेच्या दृष्टीने धोका असतो. सोबतच अकारण लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह, अतिप्रमाणात केस गळणे हे शारीरिक पातळीवरही त्रास उद्भवतात. त्यामुळे वरकरणी केवळ पाळीशी संबंधित दिसणारी ही समस्या इतक्या साºया आजारांना आमंत्रण देते. याकडे मुलींनी व त्यांच्या पालकांनी वेळीच गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. या विषयासह इतरही महत्त्वाच्या विषयावर लंडनमधील प्रसिद्ध तज्ज्ञ सर प्रा. डॉ. अरुलकुमारन, डॉ. लूका सबातिनी, डॉ. ज्योत्स्ना पुंडीर, डॉ. संजय प्रभू, डॉ. प्रकाश सावनूर, डॉ. जयदीप टाक व डॉ. केरसी आवारी मार्गदर्शन करतील.
अधिक ताण व जंक फूडचे सेवन टाळा
‘पीसीओडी’चे कारण सांगताना डॉ. श्रीखंडे म्हणाल्या, अलीकडे मुलींना कामाचा, वाढत्या स्पर्धेचा अधिक ताण असतो. शिवाय जंक फूड, अतिगोड वा अतितिखट खाणे या सवयी त्यांच्या शरीरावर परिणाम करतात. मुख्य कारण तणावच आहे. याकडेच सर्वजणी दुर्लक्ष करतात. योग्य व्यायाम, योग्यवेळी योग्य आहार व ऊठसूठ ‘एन्टिबायोटिक्स’ला दूर ठेवल्यास हा आजार दूर ठेवण्यास मदत होते.
महिला-पुरुषांमध्ये वंध्यत्व‘फिप्टी-फिप्टी’
बाळ होत नाही म्हणून पूर्वी महिलेलाच जबाबदार धरले जायचे. ३० वर्षांपूर्वी पुरुषांमध्ये याचे प्रमाण २० टक्के तर महिलांमध्ये ३० टक्के होते. परंतु आता महिला व पुरुषांमध्ये वंध्यत्वाचे प्रमाण हे ‘फिप्टी-फिप्टी’ आहे. बदललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव, तणाव व लठ्ठपणा ही काही कारणे आहेत, असेही डॉ. श्रीखंडे म्हणाल्या.

Web Title: The percentage of polycystic ovary syndrome among girls is 40%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.