‘प्रीमॅच्युअर बेबीज्’चे प्रमाण २३.६ टक्के

By admin | Published: November 17, 2014 12:56 AM2014-11-17T00:56:43+5:302014-11-17T00:56:43+5:30

पुरेसा आहार व विश्रांती न घेतल्याने, हायपरटेन्शन, गर्भारपणात पथ्य न पाळता प्रतिकूल आहार घेणे, उशिरा उठणे व उशिरा झोपणे, लेटनाईट पार्ट्यांना जाणे, धूम्रपान, मद्यपान यांचा अतिरेक करणे,

The percentage of premier babies is 23.6 percent | ‘प्रीमॅच्युअर बेबीज्’चे प्रमाण २३.६ टक्के

‘प्रीमॅच्युअर बेबीज्’चे प्रमाण २३.६ टक्के

Next

बदलत्या जीवनशैलीमुळे वाढतेय प्रमाण : आज जागतिक ‘प्रीमॅच्युअर डे’
नागपूर : पुरेसा आहार व विश्रांती न घेतल्याने, हायपरटेन्शन, गर्भारपणात पथ्य न पाळता प्रतिकूल आहार घेणे, उशिरा उठणे व उशिरा झोपणे, लेटनाईट पार्ट्यांना जाणे, धूम्रपान, मद्यपान यांचा अतिरेक करणे, गर्भाशयात गुंतागुंत निर्माण होणे, वय उलटून गेल्यानंतर लग्न व त्यानंतर प्रसूती अशी परिस्थिती वाढत असल्याने अपुऱ्या दिवसांचे अर्भक (प्रीमॅच्युअर बेबीज्) जन्माला येण्याचे प्रमाण वाढले आहे. दहा-बारा वर्षांपूर्वी चार ते पाच टक्के केसेसमध्ये प्रीमॅच्युअर बेबीज् जन्माला येत होत्या. आता भारतात ते प्रमाण २३.६ टक्क्यांपर्यंत गेले असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. जगात हे प्रमाण ५९ टक्के आहे.
प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होण्यामागे असणाऱ्या अगणित कारणांमध्ये मातेचे वय हादेखील महत्त्वाचा घटक आहे. प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. राजेश अग्रवाल यांनी सांगितले, बाळाला जन्म देण्यासाठी १८ ते ३५ हा वयोगट आदर्श मानला जातो. या गटाच्या आत-बाहेर वय असेल म्हणजे १८ पेक्षा कमी किंवा ३५ पेक्षा अधिक वय असेल तर अशा डिलिव्हरीमध्ये गुंतागुंत होऊ शकते. अपुऱ्या दिवसाचे बाळ जन्माला येऊ शकते. आईचे वजन व उंची हे घटकही महत्त्वाचे असतात. वय व उंचीबरोबरच मातेचे बीएमआय अर्थात बॉडी मास इंडेक्सही यात महत्त्वाची भूमिका पार पाडते. मातेची हाडे कितपत मजबूत आहेत यावर बाळाची वाढ अवलंबून असते. ज्या मातांच्या आहारात जीवनसत्त्वे व प्रथिनांचा अभाव असतो, ज्यांना केवळ जंक फूडचीच आवड असते अशा महिलांची बाळे मुदतीच्या आधी जन्माला येण्याची शक्यता अधिक असते. स्थूलता जरी प्रत्यक्षपणे प्रीमॅच्युर डिलिव्हरीला कारणीभूत ठरत नसली तरी त्यामुळे हायरपरटेन्शन व मधुमेहाची शक्यता वाढवू शकते. ज्यांचे पहिले बाळंतपण वेळेच्या आधी झाले असेल त्यांचे दुसरे बाळंतपणही असेच होण्याची शक्यता असते. याशिवाय आययुआय, आयव्हीएफ अर्थात टेस्टट्यूब बेबी या ट्रीटमेंटद्वारे गर्भारपण असेल तर अशा केसेमध्येही प्रीमॅच्युअर डिलिव्हरीजची शक्यता असते. तसेच थायरॉईडचा त्रास असणाऱ्यांना या डिलिव्हरीजचा धोका अधिक असतो. यातील तीन ते पाच टक्के महिलांना त्याचा त्रास होतो.(प्रतिनिधी)

Web Title: The percentage of premier babies is 23.6 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.