खापा परिसरात लसीकरणाचा टक्का वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:13 AM2021-05-05T04:13:47+5:302021-05-05T04:13:47+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क खापा : शहर व परिसरात लसीकरणाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत ६,३१४ जणांनी काेविड लस ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
खापा : शहर व परिसरात लसीकरणाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत ६,३१४ जणांनी काेविड लस टाेचून घेतली आहे. दुसरीकडे काेराेनाबाधितांच्या संख्येत घट आली असून, शहरात ३८८ पाॅझिटिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी २४८ रुग्ण बरे झाले आहेत. सद्यस्थितीत १४० सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती डाॅक्टरांनी दिली.
काेराेना संसर्ग राेखण्यासाठी आराेग्य विभागाने लसीकरणाला वेग दिला आहे. स्थानिक प्रशासन व आराेग्य विभागाच्या जनजागृतीनंतर शहरासह ग्रामीण भागातील नागरिकही लस घेण्यासाठी समाेर येत आहेत. लसीकरणामुळे शरीरातील राेगप्रतिकारशक्ती विकसित हाेते. काेराेनापासून बचाव करण्यासाठी लस एकमात्र पर्याय असल्याचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. प्रशांत वाघ यांनी सांगितले. शहरातील काेराेना रुग्णांची घटत असलेली संख्या दिलासा देणारी आहे. काेराेनाचा नायनाट करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन मुख्याधिकारी डाॅ. ऋचा धाबर्डे यांनी केले आहे.