बाधितांचा टक्का घसरतोय पण...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:09 AM2021-05-09T04:09:03+5:302021-05-09T04:09:03+5:30
सावनेर/ काटोल/नरखेड/उमरेड/ कळमेश्वर/कुही/ कामठी/ हिंगणा/ मौदा : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. मात्र, शुक्रवारी ...
सावनेर/ काटोल/नरखेड/उमरेड/ कळमेश्वर/कुही/ कामठी/ हिंगणा/ मौदा : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. मात्र, शुक्रवारी मध्यरात्रीच्या अहवालानुसार ५४७९ चाचण्यांमधून १७९७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे ग्रामीण भागात संक्रमणाची टक्केवारी अद्यापही ३२.७९ टक्के असल्याचे स्पष्ट होते. अद्यापही अनेक तालुक्यात कोरोना चाचणी किटचा तुटवडा आहे, तर काही गावांत ग्रामस्थ घरीच उपचार घेत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोनाची साखळी तुटण्यासाठी चाचण्यांचे प्रमाण आणि रुग्णांवर योग्य उपचार होणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील तेरा तालुक्यांत १६ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यूची संख्या २०४१ इतकी झाली आहे. ग्रामीण भागात आतापर्यंत १,२८,३४० नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील ९९,२०७ रुग्ण बरे झाले. शनिवारी ३०४० रुग्ण कोरोनामुक्त झाले. सध्या ग्रामीण भागात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २७,०१७ इतकी आहे.
सावनेर तालुक्यात ६६ रुग्णांची नोंद झाली. यात सावनेर शहरातील १५ तर ग्रामीणमधील ५१ रुग्णांचा समावेश आहे. नरखेड तालुक्यात १३७ रुग्णांची भर पडली. यात नरखेड शहरातील १६ तर ग्रामीण भागातील १२२ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २०४८, तर शहरात ४३९ इतकी झाली आहे. सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत १८, जलालखेडा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत ४०, मेंढला प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत ५१, तर मोवाड प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत गावांमधून १३ रुग्णांची नोंद झाली.
काटोल तालुक्यात ५२२ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत १०६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात काटोल शहरातील २०, तर ग्रामीण भागातील ८६ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील कचारी सावंगा केंद्र अंतर्गत ४०, कोंढाळी केंद्र अंतर्गत ३०, तर येनवा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत १६ रुग्णांची नोंद झाली.
कुही तालुक्यात १७८ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात कुही येथे दोन, तर भामेवाडा व वेलतूर येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. उमरेड तालुक्यात ७३ रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील ४१, तर ग्रामीण भागातील ३२ रुग्णांचा समावेश आहे. कामठी तालुत्यात २९२ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत २८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. मौदा तालुक्यात १०८ चाचण्यापैकी २४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. हिंगणा तालुक्यात ५५५ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत ५८ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. यात वानाडोंगरी येथे सर्वाधिक २७ रुग्णांची नोंद झाली. तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या १०,९९५ झाली आहे. यातील ८,९०६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. मृत्युसंख्या २३७ झाली आहे. रामटेक तालुक्यात २३ रुग्णांची नोंद झाली. यात रामटेक शहरातील २, तर ग्रामीण भागातील २१ रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यात आतापर्यंत ६३०७ रुग्णांची नोंद झाली आहे. यातील ४८२९ रुग्ण कोरोनामुक्त झाले. १२३ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या तालुक्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १३९९ इतकी आहे.
कळमेश्वर तालुक्यात धोका वाढला
कळमेश्वर तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. तालुक्यात १४२ रुग्णांची भर पडली. यात कळमेश्वर-ब्राह्मणी शहरातील ३२ तर ग्रामीण भागातील ११० रग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात मोहपा येथे १५, धापेवाडा (११), घोराड (८), आष्टीकला (७), कळंबी, गुमथळा, तेलगाव, उपरवाही येथे प्रत्येकी ५ रुग्णांची नोंद झाली. इतर लहान गावातही प्रत्येकी एक ते दोन रुग्णांची नोंद झाली.