विजेच्या देखभाल-दुरुस्तीची कामे करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:09 AM2021-05-14T04:09:44+5:302021-05-14T04:09:44+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रेवराल : माैदा तालुक्यातील बहुतांश गावांत वादळामुळे विजेचे खांब व तारांची पडझड झाली. परंतु याकडे महावितरणच्या ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रेवराल : माैदा तालुक्यातील बहुतांश गावांत वादळामुळे विजेचे खांब व तारांची पडझड झाली. परंतु याकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष न देता केवळ थातूरमातूर दुरुस्ती केल्याचे दिसून येत आहे. वादळामुळे तुटून पडलेल्या जिवंत विद्युत तारेला स्पर्श झाल्याने खंडाळा शिवारात गाईचा मृत्यू झाला. सुदैवाने गाईचा मालक थाेडक्यात बचावला. त्यामुळे ग्रामीण भागातील विजेच्या देखभाल-दुरुस्तीची कामे तत्काळ करा, अन्यथा आंदाेलनाचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.
खंडाळा व परिसरातील गावात १० मे राेजी चक्रीवादळामुळे विद्युत तारा तुटल्या. दरम्यान, दुसऱ्या दिवशीही तुटून पडलेल्या तारांमध्ये वीजप्रवाह सुरू हाेता. शेतशिवारात चराईसाठी गेलेल्या गाईचा जिवंत तारेला स्पर्श हाेऊन मृत्यू झाला. यात गाईचा मालक संदेश राजू बर्वे हा थाेडक्यात बचावला. परिसरात थाेडादेखील वादळ वारा आल्यास वीजपुरवठा खंडित हाेताे. विद्युत समस्या व महावितरणच्या भाेंगळ कारभारामुळे या भागातील गावकरी त्रस्त झाले आहेत. याकडे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष पुरवून चाचेर, खंडाळा, तारसा परिसरात वीजपुरवठा करणारे विद्युत खांब व तारांच्या देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यात यावी. तसेच गाईच्या मृत्यूची नुकसानभरपाई द्यावी, अन्यथा महावितरणविराेधात आंदाेलनाचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.