पक्का वाहन परवानाही होणार आॅनलाईन

By admin | Published: November 11, 2014 12:58 AM2014-11-11T00:58:20+5:302014-11-11T00:58:20+5:30

प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) शिकाऊ परवानासाठी आॅनलाईन अपॉर्इंटमेंटची सोय उपलब्ध करून दिली आहे. यामुळे शिकावू उमेदवाराला आपल्या सोयीनुसार दिवस व वेळ निवडणे शक्य झाले आहे.

Permanent auto license will also be available online | पक्का वाहन परवानाही होणार आॅनलाईन

पक्का वाहन परवानाही होणार आॅनलाईन

Next

आरटीओ : सोय पुढील महिन्यापासून
नागपूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) शिकाऊ परवानासाठी आॅनलाईन अपॉर्इंटमेंटची सोय उपलब्ध करून दिली आहे. यामुळे शिकावू उमेदवाराला आपल्या सोयीनुसार दिवस व वेळ निवडणे शक्य झाले आहे. मागील महिन्यापासून सुरू झालेल्या या योजनेला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आता याच धर्तीवर १ डिसेंबरपासून पक्क्या वाहन परवान्यासाठी आॅनलाईन भेटीची वेळ देण्याची पद्धत लागू होण्याची माहिती आहे.
शिकाऊ परवानासाठी प्रत्यक्ष हजर राहून मोटार वाहन कायद्यानुसार चाचणी परीक्षा द्यावी लागते. त्यासाठी आरटीओ उमेदवारांची प्रचंड गर्दी होत होती.
नागरिकांना तासनतास उभे राहावे लागायचे. त्यामुळे वेळ आणि श्रम वाया जात होता. काही वेळा पूर्ण दिवस वाया जात होता. या सर्व व्यापातून मुक्त होण्यासाठी परिवहन कार्यालयाने आॅनलाईन अपॉर्इंटमेंटची सोय उपलब्ध करून दिली. आरटीओ, शहर व ग्रामीण कार्यालयात १ सप्टेंबरपासून तर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पूर्वमध्ये १७ सप्टेंबरपासून ही पद्धत सुरू झाली. सुरुवातीला याला कमी प्रतिसाद मिळाला, परंतु आठवड्याभरातच चांगला प्रतिसाद मिळू लागला. आता याला घेऊनच पक्के परवानासाठीही हीच पद्धत लागू करण्याची तयारी सुरू झाली आहे. या सोयीमुळे उमेदवाराला वाहन चाचणीसाठी आपल्या सोयीनुसार दिवस व वेळ निवड करणे शक्य होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Permanent auto license will also be available online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.