रेमडेसिविरचा काळबाजार करणारा कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 10:17 PM2021-04-23T22:17:20+5:302021-04-23T22:17:38+5:30
Nagpur News जीवन-मृत्यूच्या संघर्षात अडकलेल्या कोरोना बाधितांच्या नातेवाईकांना प्रचंड मानसिक यातना देत रेमडेसिविरची काळबाजारी करणाऱ्या एका आरोपीला कोरोनाने दंश केला आहे. तर, त्याच्या संपर्कात आलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यालाही कोरोनाने विळखा घातला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जीवन-मृत्यूच्या संघर्षात अडकलेल्या कोरोना बाधितांच्या नातेवाईकांना प्रचंड मानसिक यातना देत रेमडेसिविरची काळबाजारी करणाऱ्या एका आरोपीला कोरोनाने दंश केला आहे. तर, त्याच्या संपर्कात आलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यालाही कोरोनाने विळखा घातला आहे.
रेमडेसिविरची काळबाजारी करणाऱ्या प्रणय दिनकरराव येरपुडे, शुभम संजय पाणतावणे आणि मनमोहन नरेश मदन या तिघांना २० फेब्रुवारीच्या रात्री सीताबर्डी पोलिसांनी अटक केली. त्यांचे जामठ्यातील साथीदार फरार आहेत. या तिघांची पोलिसांनी वैद्यकीय तपासणी केली असता त्यातील येरपुडे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ही कारवाई करणाऱ्या सीताबर्डी पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची पोलिसांनी टेस्ट केली असता पोलीस शिपाईसुद्धा पॉझिटिव्ह आला. या घडामोडीमुळे सीताबर्डी पोलिसांत एकच खळबळ उडाली. दरम्यान, आरोपीला पाचपावलीच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठविण्यात आले असून, पोलीस शिपायाला होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.