विचारांवर निष्ठा असलेली व्यक्ती राजकारणात यावी : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 12:04 AM2018-09-29T00:04:40+5:302018-09-29T00:05:50+5:30

विचारांवर निष्ठा असलेली आणि कटिबद्ध राहून काम करणारी व्यक्ती आज प्रत्येक राजकीय पक्षात यायला हवी. तीच राजकारणाची आणि सशक्त लोकशाहीची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.

The person who is loyal to thinking should come in politics: Nitin Gadkari | विचारांवर निष्ठा असलेली व्यक्ती राजकारणात यावी : नितीन गडकरी

विचारांवर निष्ठा असलेली व्यक्ती राजकारणात यावी : नितीन गडकरी

Next
ठळक मुद्देपूरणचंद्र मेश्राम यांच्या कार्याचा गौरव

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विचारांवर निष्ठा असलेली आणि कटिबद्ध राहून काम करणारी व्यक्ती आज प्रत्येक राजकीय पक्षात यायला हवी. तीच राजकारणाची आणि सशक्त लोकशाहीची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. पूरणचंद्र मेश्राम यांचा कार्यगोरव सोहळा शुक्रवारी सिव्हील लाईन्स येथील डॉ. देशपांडे सभागृहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी डॉ. पूरणचंद्र्र मेश्राम व त्यांच्या पत्नी डॉ. राजर्षी मेश्राम यांचा शाल, मानपत्र, व तथागत गौतम बुद्धांची मूर्ती भेट देऊन कार्याचा गौरव करण्यात आला. विविध संघटनांकडूनही त्यांचा सत्कार करण्यात आला.
अध्यक्षस्थानी नियोजन आयोगाचे माजी सदस्य व माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर होते.
आपल्या सत्काराला उत्तर देताना डॉ. पूरणचंद्र मेश्राम यांनी आपला आजचा सत्कार हा माझी आई, लहान बहीण आणि पत्नी या तीन महिला शक्तींना समर्पित करीत असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी आपल्या जीवनातील अनेक घटना विषद करीत आठवणींना उजाळा दिला.
यावेळी केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, आ. जोगेंद्र कवाडे, डॉ. वेदप्रकाश मिश्रा ज्येष्ठ पत्रकार नौशाद उस्मान यांनी डॉ. पूरणचंद्र मेश्राम यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.
आयोजन समितीचे अध्यक्ष गिरीश गांधी यांनी प्रास्ताविक केले. संचालन कोमल ठाकरे यांनी केले. कार्याध्यक्ष डॉ. अनिल हिरेखण यांनी आभार मानले.
यावेळी आयोजन समितीचे डॉ. नीरज बोधी, डॉ. शकील सत्तार, डॉ, आमप्रकाश चिमणकर, डॉ. मिलिंद साठे,, राजन वाघमारे, बाळू घरडे आदी व्यासपीठावर होते.

संविधानाच्या रक्षणाची आज गरज
आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी आज भारतीय संविधान वाचवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. एससीएसटीला क्रिमिलेयर लागू करण्याचा प्रयत्न होतोय. ते होता कामा नये, यासाठी वेळ पडली तर रस्त्यावर उतरावे लागेल. कार्यक्षमतेच्या बोगस नावाखाली एससीएसटीला संधीपासून दूर ठेवण्याचे षड्यंत्र सुरु असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. समाजाने या विषयावर चिंतन करावे, असे आवाहनही केले.

Web Title: The person who is loyal to thinking should come in politics: Nitin Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.