हनुमान मंदिर पाडण्याविरुद्धची याचिका फेटाळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:12 AM2021-09-09T04:12:39+5:302021-09-09T04:12:39+5:30
नागपूर : ग्रेट नाग रोडवरील श्री संकटमोचन हनुमान मंदिर पाडण्याच्या कारवाईला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ...
नागपूर : ग्रेट नाग रोडवरील श्री संकटमोचन हनुमान मंदिर पाडण्याच्या कारवाईला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी गुणवत्ताहीन ठरवून फेटाळून लावली. न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांनी हा निर्णय दिला.
ही याचिका मंदिर ट्रस्टने दाखल केली होती. हे मंदिर भोसलेकालीन आहे. त्यामुळे त्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. यासंदर्भात पुरातत्त्व विभागाने ३१ मार्च २०२१ रोजी पत्र जारी केले आहे असे ट्रस्टचे म्हणणे होते. उच्च न्यायालयाने ट्रस्टचे मुद्दे अमान्य केले. संबंधित ठिकाणी काही भिंती व टिनाचे शेड असून त्याला हेरीटेज किंवा ऐतिहासिक बांधकाम म्हणता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच, ट्रस्टकडे या मालमत्तेच्या मालकीची कागदपत्रे व बांधकाम मंजुरीचा आराखडाही नाही, असेदेखील हा निर्णय देताना स्पष्ट करण्यात आले.