मंदिर बांधकामाविरुद्ध हायकोर्टात याचिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:08 AM2021-03-10T04:08:41+5:302021-03-10T04:08:41+5:30
नागपूर : सार्वजनिक जमिनीवर बांधण्यात येत असलेल्या मंदिराविरुद्ध न्यू रामदासपेठ काचीपुरा नागरिक मंडळाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका ...
नागपूर : सार्वजनिक जमिनीवर बांधण्यात येत असलेल्या मंदिराविरुद्ध न्यू रामदासपेठ काचीपुरा नागरिक मंडळाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. संबंधित बांधकाम अनधिकृत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
या प्रकरणावर मंगळवारी न्यायमूर्तीद्वय नितीन जामदार व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाने वादग्रस्त बांधकाम कोण करीत आहे, अशी विचारणा केली. त्यावर कुणालाच उत्तर देता आले नाही. परिणामी, न्यायालयाने वादग्रस्त बांधकाम अनधिकृत असेल तर, ते हटविण्यासाठी नोटीस जारी करा व कुणी आक्षेप नोंदविल्यास त्यावर कायद्यानुसार निर्णय घ्या, असे निर्देश महानगरपालिकेला दिले. तसेच, महानगरपालिकेने यासंदर्भात योग्य माहिती सादर करण्यासाठी वेळ मागितल्यामुळे प्रकरणावर उद्या पुढील सुनावणी निश्चित केली. याचिकाकर्त्यानुसार, संबंधित ठिकाणी मंदिर बांधण्यासाठी सिमेंटचा ओटा तयार करण्यात आला आहे. त्याकरिता महानगरपालिकेची परवानगी घेण्यात आली नाही. ते बांधकाम अनधिकृत आहे.