नागपुरात मेट्रो प्रकल्पात पीट्रेक टेक्नॉलॉजीचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 01:06 AM2018-05-20T01:06:26+5:302018-05-20T01:06:44+5:30
नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या कार्याला अतिरिक्त गती देण्यासाठी आता महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉपोर्रेशन लिमिटेडने (महामेट्रो) पीट्रेक टेक्नॉलॉजीचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ट्रॅकचे काम वेगात होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या कार्याला अतिरिक्त गती देण्यासाठी आता महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉपोर्रेशन लिमिटेडने (महामेट्रो) पीट्रेक टेक्नॉलॉजीचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ट्रॅकचे काम वेगात होणार आहे.
ट्रॅकलेर्इंग मशीनच्या साहाय्याने पीट्रेक किंवा बॉटम-अपचा वापर होणार आहे. ‘पीट्रेक टेक्नॉलॉजी’द्वारे नवीन काँक्रिटच्या थरामध्ये बेसप्लेट बसविणे सोपी होणार आहे. त्यामुळे काम लवकरच पूर्ण होईल. तसेच वायडक्ट किंवा भूपातळीवर दररोज २०० मीटर ट्रॅक तयार करण्यास मदत होईल. पारंपरिक पद्धतीपेक्षा पीट्रेक टेक्नॉलॉजीने कामाची गतीने दुपटीपेक्षा जास्त असते. या तंत्रज्ञानाचा वापर केल्याने कार्यस्थळी स्वच्छता राहते आणि कर्मचाऱ्यांचे आरोग्य उत्तम व त्यांना सुरक्षा मिळते. या तंत्रज्ञानाचा वापर प्रायोगिक तत्त्वावर होणार असून मिहान डेपो परिसरात हा प्रयोग राबविला जाणार आहे. सध्या या तंत्रज्ञानाच्या माध्यमाने रुळ बसविण्याचे कार्य सौदी अरेबियामधील रियाध येथे सुरू आहे. एका महिन्याच्या कालावधीत ही मशीन नागपूरला आणण्यात येणार असून त्वरित काम सुरू होण्याची अपेक्षा आहे.