नागपुरात पेट्रोल १.६५ रुपयांनी स्वस्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 12:05 PM2019-05-13T12:05:48+5:302019-05-13T12:06:17+5:30
आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या कि मतीत घसरण झाल्याने भारतीय तेल कंपन्यांनी इंधन दरात कपात केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या कि मतीत घसरण झाल्याने भारतीय तेल कंपन्यांनी इंधन दरात कपात केली आहे. गेल्या १५ दिवसात कच्च्या तेलाचे दरात ६ डॉलर प्रती बॅरलने घसरण झाली आहे. त्यामुळे इंधनाचे दर कमी झाले आहेत. १४ दिवसात पेट्रोल प्रती लिटर १.६५ रुपये आणि डिझेल ७७ पैशांनी स्वस्त झाले आहे. सोमवारी पेट्रोलचे दर ७७.५१ आणि डिझेल ६९.६५ रुपये राहणार आहे.
प्राप्त माहितीनुसार, ३० एप्रिलला पेट्रोल ७९.२४ रुपये होते. तेव्हापासून दरात घसरण सुरू आहे. २ मे रोजी ७९.१९ रुपये, ५ मे रोजी ७९.१३ रुपये, ९ मे रोजी ७८.९१, ११ मे रोजी ७९.२२, १२ मे ७७.८१ रुपयांपर्यंत कमी झाले. १२ मेच्या मध्यरात्री पेट्रोल पुन्हा ३० पैशांनी कमी होऊन प्रति लिटर ७७.५१ रुपयांवर स्थिरावले. सर्वाधिक घसरण गेल्या चार दिवसात १.१९ रुपयांची झाली. पेट्रोल व डिझेलच्या दरांत येत्या काही दिवसात आणखी कपात होण्याची शक्यता आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाही मजबूत झाला असून इंधन आयातीच्या खर्चात लक्षणीय कपात होणार आहे.
दरकपातीमुळे डीलर्सला तोटा
पूर्वी पेट्रोलचे दर ४, ६ आणि १० पैशांनी वाढायचे आणि त्याप्रमाणात कपातही व्हायची. तेव्हा डीलर्स नफा-तोट्याचा समन्वय साधायचे. पण चार दिवसात पेट्रोल १.१९ रुपयांनी कमी झाल्यामुळे डीलर्सला तोटा सहन करावा लागत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलात घसरण होत असल्यामुळे देशांतर्गत इंधनाचे भाव कमी होत आहे. पुढेही दर कमी होण्याची शक्यता आहे.
- हरजीतसिंग बग्गा, उपाध्यक्ष,
विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशन.