नागपुरात पेट्रोल ११० पार, डिझेलची शंभरीकडे वाटचाल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2021 10:32 PM2021-10-11T22:32:46+5:302021-10-11T22:33:29+5:30
बारा दिवसांत पेट्रोल २.९० रुपये तर डिझेल ३.७४ रुपयांनी वाढून अनुक्रमे ११०.१० रुपये आणि ९९.२१ रुपयांवर पोहोचले.
नागपूर : महागाईत पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीची भर पडली असून मंगळवारी पेट्रोल प्रति लिटर ११०.१० रुपये आणि डिझेल ९९.२१ रुपयांवर पोहोचले. आता डिझेलचीही शंभरीकडे वाटचाल सुरू आहे. वर्षभरात डिझेल प्रति लिटर २३ रुपयांनी वाढले आहे. मालवाहतुकीचे दर वाढल्याने सर्वच जीवनावश्यक वस्तू महाग झाल्या आहेत. २८ सप्टेंबरला पेट्रोल १०७.२० रुपये आणि डिझेलचे दर ९५.४७ रुपये होते. त्यानंतर दरदिवशी २० ते ४० पैशांनी वाढ झाली. बारा दिवसांत पेट्रोल २.९० रुपये तर डिझेल ३.७४ रुपयांनी वाढून अनुक्रमे ११०.१० रुपये आणि ९९.२१ रुपयांवर पोहोचले.