महिनाभरात पेट्रोलचा चौकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 01:50 AM2017-09-09T01:50:39+5:302017-09-09T01:50:54+5:30

पेट्रोलियम मंत्रालयाच्या निर्णयानुसार १६ जूनपासून दरदिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलत आहे. १ आॅगस्ट ते ८ सप्टेंबरपर्यंत दरांचा आढावा घेतल्यास या दिवसात पेट्रोलचे दर तब्बल ४.०६ रुपयांनी वाढले आहेत.

 Petrol four times in a month | महिनाभरात पेट्रोलचा चौकार

महिनाभरात पेट्रोलचा चौकार

Next
ठळक मुद्देचार रुपयांनी वाढले : महागाईचा न जाणवता धक्का, जीएसटीच्या कर टप्प्यात आणा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पेट्रोलियम मंत्रालयाच्या निर्णयानुसार १६ जूनपासून दरदिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलत आहे. १ आॅगस्ट ते ८ सप्टेंबरपर्यंत दरांचा आढावा घेतल्यास या दिवसात पेट्रोलचे दर तब्बल ४.०६ रुपयांनी वाढले आहेत. महागाईचा धक्का लागू न देता तेल कंपन्यांनी दरवाढ केली आहे. त्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. दर कमी होण्यासाठी पेट्रोल-डिझेलला जीएसटीच्या करटप्प्यात आणण्याची मागणी ग्राहक संघटनांनी केली आहे.
१६ जूनपूर्वी दर १५ दिवसांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर खनिज तेलाच्या बाजारभावांचा अंदाज घेऊन पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी व्हायचे. पण आता दरदिवशी रात्री १२ नंतर दर बदलविण्याचा निर्णय तेल कंपन्यांनी घेतला. त्यानुसार १६ जूनपासून दर कमी वा जास्त होत आहेत. १ ते ८ सप्टेंबरपर्यंत पेट्रोल ६५ पैशांनी महागले आहेत. तेल कंपन्यांच्या निर्णयानंतर १६ जून ते १५ जुलैपर्यंत पेट्रोलची दरकपात झाली. १ ते ३१ आॅगस्टदरम्यान पेट्रोलमध्ये प्रति लिटर ३.६८ रुपयांची वाढ झाली. दरवाढीवर नेहमीच आंदोलन करणाºया ग्राहक संघटनांनी चुप्पी साधली आहे.
प्रतिक्रिया देण्यास अधिकाºयांचा नकार
दरदिवशी १० ते ३० पैशांनी पेट्रोलची दरवाढ होत असल्यामुळे ग्राहकांना दरवाढीचा अंदाज येत नाही. पण संपूर्ण महिन्याची दरवाढ पाहता ग्राहकांच्या खिशातून कंपन्या हळूहळू पैसा काढत आहेत. अधिकाºयांनी दररोजच्या दरवाढीवर बोलण्यास नकार दिला. दरदिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलत आहेत. त्याचा फायदा ग्राहकांना होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. पण प्रत्यक्षात उलटच घडलेले दिसत आहे. खनिज तेलाचे भाव गेल्या काही वर्षांमध्ये उतरलेले आहेत आणि रुपया डॉलरच्या तुलनेत मजबूत झाल्यानंतरही पेट्रोल व डिझेलच्या दरांमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. ग्राहकांना कधी पेट्रोल दरकपातीचा फायदा होतो तर कधी फटका बसतो. आॅगस्ट महिन्याभरात ग्राहकांच्या खिशातून एक लिटर पेट्रोलमागे जास्तीचे ३.६८ रुपये काढून घेणे चुकीचे असल्याचे ग्राहक संघटनांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

Web Title:  Petrol four times in a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.