नागपुरात पेट्रोल १०० रुपयांवर जाण्याची शक्यता! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2020 10:59 AM2020-12-10T10:59:20+5:302020-12-10T11:03:30+5:30

Nagpur News petrol कोरोना महामारीने त्रस्त असलेल्या लोकांना आता पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर संकट वाटू लागले आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातच पेट्रोल १.३३ रुपये आणि डिझेल १.५४ रुपयांनी महाग झाले आहे.

Petrol likely to go up to Rs 100! in Nagpur | नागपुरात पेट्रोल १०० रुपयांवर जाण्याची शक्यता! 

नागपुरात पेट्रोल १०० रुपयांवर जाण्याची शक्यता! 

googlenewsNext
ठळक मुद्दे पेट्रोल १.३३ तर डिझेल १.५४ रुपयांनी वाढलेकच्च्या तेलाच्या किमती वाढल्या

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : कोरोना महामारीने त्रस्त असलेल्या लोकांना आता पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर संकट वाटू लागले आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातच पेट्रोल १.३३ रुपये आणि डिझेल १.५४ रुपयांनी महाग झाले आहे. ही दरवाढ पुढील काही दिवस सुरूच राहणार असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.

ही दरवाढ आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे झाली आहे. तेल उत्पादक देश (ओपेक) कच्च्या तेलाचे उत्पादन कमी करण्याचा विचार करीत आहेत. असे झाल्यास पुढील काही दिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर आणखी वाढू शकतात. पेट्रोलचे दर १०० रुपयांवर जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तारखेची गोष्ट केल्यास १ डिसेंबरला नागपुरात पेट्रोलचे प्रति लिटर दर ८९.५८ रुपये आणि डिझेल ७९.५९ रुपये होते. त्यानंतर ७ डिसेंबरपर्यंत ही दरवाढ सुरू होती. पण ७ ते ९ तारखेपर्यंत दर स्थिर होते. ९ डिसेंबरला पेट्रोल ९०.९१ रुपये आणि डिझेल ८१.१३ रुपयांवर गेले. याप्रकारे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पेट्रोल १.३३ रुपये आणि डिझेल १.५४ रुपये महागले आहे.

तारीख पेट्रोल डिझेल

१ डिसें. ८९.५८ ७९.५९

२ डिसें. ८९.७३ ७९.८४

३ डिसें. ८९.६९ ८०.०४

४ डिसें. ९०.०९ ८०.२८

५ डिसें. ९०.३५ ८०.२८

६ डिसें. ९०.६२ ८०.८६

७ डिसें. ९०.९१ ८१.१३

८ डिसें. ९०.९१ ८१.१३

९ डिसें. ९०.९१ ८१.१३

(दर प्रति लिटरचे आहेत.)

Web Title: Petrol likely to go up to Rs 100! in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.