आठ दिवसांत पेट्रोल १.४५ रुपयांनी महाग, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 10:26 AM2019-01-14T10:26:38+5:302019-01-14T14:18:00+5:30
प्रति लिटर ९० रुपयांवर पोहोचलेले पेट्रोलचे दर काही महिन्यांत ७५ रुपयांच्या आत आल्यानंतर ग्राहकांना दिलासा मिळाला होता. पण आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलात दरवाढ झाल्यानंतर भाव पुन्हा ७५ रुपयांवर पोहोचले असून रविवारी ७५.९१ रुपयांवर पोहोचले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रति लिटर ९० रुपयांवर पोहोचलेले पेट्रोलचे दर काही महिन्यांत ७५ रुपयांच्या आत आल्यानंतर ग्राहकांना दिलासा मिळाला होता. पण आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलात दरवाढ झाल्यानंतर भाव पुन्हा ७५ रुपयांवर पोहोचले असून रविवारी ७५.९१ रुपयांवर पोहोचले आहेत.
२३ डिसेंबर २०१८ ला ७५.९३ रुपये दर होते. त्यानंतर दरकपात होऊन १ जानेवारीला दर ७४.८२ रुपयांपर्यंत खाली आले होते. त्यानंतर हळूहळू दरकपात झाली. ६ जानेवारीला पेट्रोलच्या प्रति लिटर दरात १५ पैशांची कपात होऊन ७४.४६ रुपयांवर पोहोचले. त्यात हळूहळू वाढ होऊन १२ जानेवारीला दर ७५.४२ रुपयांवर स्थिरावले. शनिवारच्या मध्यरात्री ४९ पैशांनी वाढ होऊन दर ७५.९१ रुपयांवर पोहोचले. कच्च्या तेलाच्या दरवाढीच्या तुलनेत पेट्रोलचे दर आणखी वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली.
पेट्रोल-डिझेलचे दर
मुंबई - पेट्रोल - 75.81 , डिझेल - 67.22
पुणे - पेट्रोल - 75.69 , डिझेल - 66.06
नाशिक - पेट्रोल - 76.31 , डिझेल - 66.66
रत्नागिरी - पेट्रोल - 77 , डिझेल - 67.35
कोल्हापूर - पेट्रोल - 76.14 , डिझेल - 66.52
औरंगाबाद - पेट्रोल - 76.91 , डिझेल - 68.33