नागपुरात १५ दिवसात पेट्रोलमध्ये १.२२ रुपयांची घसरण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 09:55 PM2019-08-08T21:55:03+5:302019-08-08T21:55:46+5:30
तेल कंपन्यांनी गुरुवारही इंधन दरात कपात केली. २३ जुलैच्या पेट्रोलच्या प्रति लिटर ७९.५७ रुपये दरानुसार ७ ऑगस्टपर्यंत १.२२ रुपयांची कपात झाली आहे तर डिझेल ४३ पैशांनी कमी झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरानुसार तेल कंपन्याकडून भारतीय बाजारात पेट्रोल-डिझेलचा दर दररोज बदलला जातो. यानुसार तेल कंपन्यांनी गुरुवारही इंधन दरात कपात केली. २३ जुलैच्या पेट्रोलच्या प्रति लिटर ७९.५७ रुपये दरानुसार ७ ऑगस्टपर्यंत १.२२ रुपयांची कपात झाली आहे तर डिझेल ४३ पैशांनी कमी झाले.
५ जुलैच्या केंद्रीय अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवर प्रत्येकी दोन रुपये अधिभार लावल्यानंतर नागपुरात ६ जुलैला पेट्रोलचे दर इतर करांसह २.४२ रुपये आणि डिझेल २.५० रुपयांनी वाढले होते. अर्थात पेट्रोल ७६.७० रुपयांवरून ७९.१२ रुपये आणि डिझेल ६७.९९ रुपयांवरून ७०.४९ रुपयांवर पोहोचले होते. त्यानंतर घसरण सुरू झाली. पण २३ जुलैला पेट्रोलचे दर पुन्हा ७९.५७ रुपयांपर्यंत वाढले आणि डिझेल प्रति लिटर ७०.०२ रुपयांपर्यंत खाली आले. त्यानंतर इंधन कपात सुरूच आहे. २९ जुलैला पेट्रोल ७०.१५ रुपये, १ ऑगस्टला ७८.९७ रुपये, २ ऑगस्टला ७८.८१ रुपये, ६ ऑगस्टला ७८.४० रुपये आणि ७ ऑगस्टला दर ७८.३५ रुपयांपर्यंत खाली आले. वास्तविक पाहता ५ जुलैनंतर पेट्रोलच्या दरात ७७ पैसे आणि डिझेलचे दर ४३ पैशांनी कमी झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ७० रुपयांवरून ५८ डॉलरपर्यंत उतरल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दरदिवशी घसरण पाहायला मिळत आहे. इंधनाचे दर आणखी कमी होण्याची शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली.