पेट्रोलपंपावर दरोडा टाकणाऱ्या सहा दरोडेखोरांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 11:47 PM2018-07-18T23:47:55+5:302018-07-18T23:48:59+5:30

 नागपूर जिल्ह्यातील  नरखेड येथील सावरगाव रोडवरील पेट्रोलपंपावर दरोडा टाकणाऱ्या सहा आरोपींना नरखेड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून वाहनासह मोबाईल हॅन्डसेट असा ऐवज जप्त केला. या सहाही आरोपींना २१ जुलेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

Petrol pump decoity, Six decoits arrested | पेट्रोलपंपावर दरोडा टाकणाऱ्या सहा दरोडेखोरांना अटक

पेट्रोलपंपावर दरोडा टाकणाऱ्या सहा दरोडेखोरांना अटक

Next
ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील  नरखेड येथील घटना : शनिवारपर्यंत पोलीस कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर  : नागपूर जिल्ह्यातील  नरखेड येथील सावरगाव रोडवरील पेट्रोलपंपावर दरोडा टाकणाऱ्या सहा आरोपींना नरखेड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून वाहनासह मोबाईल हॅन्डसेट असा ऐवज जप्त केला. या सहाही आरोपींना २१ जुलेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
चंद्रकांत ऊर्फ शेखर मंगल लैसिह (२७, रा. परसोडी दीक्षित, ता. नरखेड), चंद्रशेखर ऊर्फ नीलेश प्रभाकर कोकाटे (२७, रा. परसोडी दीक्षित), अक्षय रमेश वरुडकर (२३, रा. वॉर्ड क्र.३, शनिवारपेठ, कोंढाळी), भूषण चिरकुठराव पेठे (२६, रा. वॉर्ड क्र. ७, कोंढाळी), जगदीश मारोतराव हजारे (२५, रा. अध्यापक ले-आऊट, नागपूर), स्वप्निल वामनराव ढोरे (२५, रा. जयताळा, नागपूर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. पेट्रोलपंप दरोड्याची ही घटना शुक्रवारी (दि. १३) रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली. फिर्यादी प्रकाश गोविंदा नारनवरे (२३, रा. वॉर्ड क्र. १३, इंदिरानगर, नरखेड) याने दिलेल्या तक्रारीनुसार, तो आणि त्याचे दोन सहकारी पेट्रोलपंपावर होते. दरम्यान दोन मोटसायकलवर आलेल्या सहा दरोडेखोरांनी चाकू आणि इतर शस्त्राचा धाक दाखवित १३ हजार २६० रुपये, मोबाईल हॅन्डसेट असा एकूण २२ हजार २५९ रुपयांचा ऐवज पळविला. तसेच दरोडेखोरांनी सीसीटीव्ही व डी.व्ही.आर. बॉक्सची तोडफोड केली. या तक्रारीवरून भादंविच्या कलम ३९५, ४२७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास करताना सीसीटीव्ही फुटेजची मदत घेण्यात आली. त्यातील एक आरोपी हा नीलेश कोकाटे असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पोलीस मागावर होते. अशातच रविवारी (दि. १५) रात्री ८:४० वाजताच्या सुमारास चंद्रकांत लैसिह याला पोलिसांनी ताब्यात घेतले.त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. नीलेश कोकाटे याला सोमवारी (दि. १६) सकाळी ८ वाजताच्या सुमारास ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयात हजर केले असता २१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान उर्वरित चार आरोपी हे एमएच-३१/सीएन-१८०८ क्रमांकाच्या इनोव्हा वाहनातून नागपुरातून पसार होण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना मंगळवारी (दि. १७) अटक केली. त्यांनाही २१ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
अतुलनीय कामगिरी
ही कारवाई पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक दिलीप मसराम, पोलीस हवालदार धनराज भुक्ते, लखन महाजन, राजिक शेख, पुरुषोत्तम काकडे, नीतेश पुसाम, अनिस शेख, पृथ्वीराज चव्हाण, मनीष सोनोने, कैलास टेकाडे, मिलिंद राठोड, दिगांबर राठोड, संतोष क्षीरसागर, सायबर सेलेचे चेतन राऊत, तुलाराम चटप यांनी पार पाडली.

Web Title: Petrol pump decoity, Six decoits arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.