पेट्रोलपंपचालक सोनटक्के हत्याकांडाचा उलगडा; चक्क पोटच्या मुलीनेच दिली होती सुपारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2023 08:58 PM2023-05-23T20:58:54+5:302023-05-23T20:59:33+5:30

Nagpur News थरकाप उडवून देणाऱ्या पेट्रोलपंप मालक सोनटक्के यांच्या हत्येचा उलगडा अखेर घटनेच्या सातव्या दिवशी झाला आहे. त्यात पोटच्या विवाहित अपंग मुलीनेच ‘सुपारी किलर्स’ च्या माध्यमातून वडिलांचा गेम केल्याचे समोर आले आहे.

Petrol Pump Driver Sontakke Murder Case Revealed; It was the girl of the stomach who gave the betel nut | पेट्रोलपंपचालक सोनटक्के हत्याकांडाचा उलगडा; चक्क पोटच्या मुलीनेच दिली होती सुपारी

पेट्रोलपंपचालक सोनटक्के हत्याकांडाचा उलगडा; चक्क पोटच्या मुलीनेच दिली होती सुपारी

googlenewsNext

 

नागपूर  : थरकाप उडवून देणाऱ्या पेट्रोलपंप मालक सोनटक्के यांच्या हत्येचा उलगडा अखेर घटनेच्या सातव्या दिवशी झाला आहे. त्यात पोटच्या विवाहित अपंग मुलीनेच ‘सुपारी किलर्स’ च्या माध्यमातून वडिलांचा गेम केल्याचे समोर आले आहे. यासाठी वडिलांचे विवाहबाह्य संबंध व त्यातून उद्भवू पाहणारा प्रॉपर्टी वाद कारणीभूत ठरला आहे. पोलिसांनी आरोपी मुलीला मंगळवारी (दि.२३) सकाळी अटक केली आहे.


प्रिया किशोर माहुरतळे (३२, रा. सर्वश्री नगर, दिघोरी नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी मुलीचे नाव आहे. प्रिया ही दिलीप सोनटक्के यांची मोठी विवाहित मुलगी आहे. ती डाव्या हाताने अपंग आहे. दिलीप यांचे उमरेड येथील एका महिलेशी विवाहबाह्य संबंध असल्याने शिवाय मागील वर्षभरापासून ते उमरेड येथे एका फ्लॅटमध्ये पती-पत्नीसारखे राहत असल्यामुळे सोनटक्के कुटुंबात वाद सुरू होता. याच कारणावरून मध्यंतरीच्या काळात घरगुती भांडण, मारपीट आणि प्रकरण पोलिसांपर्यंत गेले होते.

विवाहबाह्य संबंधात दिलीप यांनी स्वत:च्या घरावरच तुळशीपत्र ठेवल्यामुळे भविष्यात कौटुंबिक प्रॉपर्टीसुद्धा हातातून जाईल. याच कारणावरून मुलगी प्रियाने ‘सुपारी किलर्स’ च्या माध्यमातून स्वत:च्या वडिलाचा गेम केला. अटकेतील तिन्ही आरोपींना पाच दिवसांच्या कोठडीत पोलिसांनी एक ना अनेक फॉर्म्युला वापरत, त्यांचे तोंड उघडण्याचे प्रयत्न केले. मात्र त्यात फारसे यश आले नाही. दरम्यान परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी अनिल मस्के, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्यासह एलसीबीने याप्रकरणाचा तपास सुरू केला.

मोबाईलचे एसडीआर व सीडीआरच्या मदतीने मृताच्या कुटुंबीयांचा खरपूस समाचार घेतला. रात्री उशिरा मोठी मुलगी प्रिया हिने आपले तोंड उघडल्याचे समजते. त्यावरूनच पोलिसांनी मंगळवारला (दि.२२) सकाळच्या सुमारास आरोपी प्रियाला अटक केली. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, पोलिस निरीक्षक जयपालसिंग गिरासे, सहायक निरीक्षक शरद भस्मे यांच्या संयुक्त कामगिरीने सोनटक्के हत्याकांडाचा पडदा उघडला.

दोन दिवसांची पोलिस कोठडी

अटकेनंतर आरोपी प्रियाला उमरेड येथील न्यायालयात हजर करण्यात आले. तिला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. हत्याकांडातील तिन्ही आरोपींची पोलीस कोठडी बुधवारला (दि.२४) संपत असून प्रकरणातील इतर बाबींचा उलगडा करण्याच्या उद्देशाने तपास अधिकारी न्यायालयाकडे आरोपींच्या कोठडीची मुदत वाढवून मागण्याची शक्यता आहे.

Web Title: Petrol Pump Driver Sontakke Murder Case Revealed; It was the girl of the stomach who gave the betel nut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.