भारत बंदला पेट्रोलियम असोसिएशनचे समर्थन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 12:51 AM2018-09-27T00:51:25+5:302018-09-27T00:52:10+5:30
नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सच्या नेतृत्वात २८ सप्टेंबरला वॉलमार्ट-फ्लिपकार्ट कराराविरोधात कॅटच्या आव्हानार्थ चेंबरने एकदिवसीय भारत बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. बंदला विदर्भ पेट्रोलियम डीलर ट्रेडर्स असोसिएशनने समर्र्थन दिले आहे. असोसिएशनचे अध्यक्ष अमित गुप्ता यांनी वॉलमार्ट-फ्लिपकार्ट कराराला भारतातील रिटेल व्यवसायाला धोका असल्याचे म्हटले आहे. भारत सरकारचे धोरण आणि विभिन्न करांमुळे पेट्रोलियम पदार्थांच्या किमतीत दरदिवशी वाढ होत आहे. या दरवाढीने असोसिएशन आणि नागरिकांच्या समस्या आणखी वाढविल्या आहेत, शिवाय नागरिकांचे बजेट बिघडले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सच्या नेतृत्वात २८ सप्टेंबरला वॉलमार्ट-फ्लिपकार्ट कराराविरोधात कॅटच्या आव्हानार्थ चेंबरने एकदिवसीय भारत बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. बंदला विदर्भ पेट्रोलियम डीलर ट्रेडर्स असोसिएशनने समर्र्थन दिले आहे. असोसिएशनचे अध्यक्ष अमित गुप्ता यांनी वॉलमार्ट-फ्लिपकार्ट कराराला भारतातील रिटेल व्यवसायाला धोका असल्याचे म्हटले आहे. भारत सरकारचे धोरण आणि विभिन्न करांमुळे पेट्रोलियम पदार्थांच्या किमतीत दरदिवशी वाढ होत आहे. या दरवाढीने असोसिएशन आणि नागरिकांच्या समस्या आणखी वाढविल्या आहेत, शिवाय नागरिकांचे बजेट बिघडले आहे.
चेंबरचे अध्यक्ष हेमंत गांधी यांनी सांगितले की, कॅटने १५ सप्टेंबरपासून दिल्लीतून सुरू केलेली संपूर्ण क्रांती रथयात्रा २७ सप्टेंबरला नागपुरात येत असून, शहराच्या प्रमुख भागातून फिरून चेंबरच्या प्रांगणात एका विशाल सभेत परावर्तित होणार आहे. भारत बंदसाठी चेंबरचे माजी अध्यक्ष प्रकाश मेहाडिया, सचिव संजय अग्रवाल, उपाध्यक्ष अर्जुनदास आहुजा, अश्विन मेहाडिया, फारुखभाई अकबानी, कोषाध्यक्ष सचिन पुनियानी, सहसचिव रामअवतार तोतला, उमेश पटेल, स्वप्निल अहिरकर, राजू माखिजा, शब्बार शकील प्रयत्नरत आहेत.
बंदच्या समर्थनार्थ पंप बंद राहणार
असोसिएशनच्या २४ सप्टेंबरच्या बैठकीत २८ सप्टेंबरच्या कॅटच्या भारत बंद आंदोलनाला समर्थन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दिवशी पेट्रोल पंप दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत बंद राहणार आहेत. पंप बंद असल्याची सूचना पंपावर प्रदर्शित करण्यात येणार आहे.