सफाई कर्मचारी झाला ‘फार्मासिस्ट’

By admin | Published: March 10, 2017 02:31 AM2017-03-10T02:31:53+5:302017-03-10T02:31:53+5:30

चुकीच्या औषधांमुळे रु ग्णाचा जीव जाऊ शकतो. एखादा अवयव कायमचा निकामी होऊ शकतो.

'Pharmacist' becomes clean worker | सफाई कर्मचारी झाला ‘फार्मासिस्ट’

सफाई कर्मचारी झाला ‘फार्मासिस्ट’

Next

मेडिकलमध्ये रुग्णांच्या जीवाशी खेळ : त्वचा व गुप्तरोग विभागातील धक्कादायक प्रकार
सुमेध वाघमारे नागपूर
चुकीच्या औषधांमुळे रु ग्णाचा जीव जाऊ शकतो. एखादा अवयव कायमचा निकामी होऊ शकतो. म्हणूनच औषधांचे ज्ञान असलेल्या फार्मासिस्टची (औषध वितरक) नेमणूक केली जाते. परंतु मध्यभारतातील सर्वात मोठे रुग्णालय असलेल्या मेडिकलच्या त्वचा व गुप्त रोग विभागात दोन फार्मासिस्ट असताना एक सफाई कर्मचारी रुग्णांना औषधांचे वितरण करीत आहे. तब्बल अडीच वर्षांपासून हा कर्मचारी रुग्णांच्या जीवाशी खेळत आहे. ‘लोकमत’च्या ‘स्टिंग आॅपरेशन’मध्ये हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

अन्न-वस्त्र-निवारा नंतरचा महत्त्वाचा प्रश्न आरोग्याचा. वाढत्या महागाईच्या काळात अनेकांना खासगी इस्पितळांत जाणे शक्य होत नाही म्हणूनच सामान्य व गरीब रुग्णांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) आशेचा किरण आहे. या रुग्णालयात विदर्भच नव्हे तर छत्तीसगड, तेलंगणा, मध्य प्रदेश येथून रुग्ण येतात. यामुळे बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) रुग्णांनी फुल्ल असते. टीबी वॉर्डाच्या परिसरात असलेल्या त्वचा व गुप्त रोग विभागातही रोज ३०० वर रुग्ण येतात. या विभागात नुकतेच काही अद्ययावत उपकरण उपलब्ध झाल्याने रुग्णांची गर्दी वाढलेली आहे. यामुळेच या विभागासाठी मनोज मानकर व विनोद सोनपिपरे नावाचे दोन फार्मासिस्ट दिले आहे.
यातील एकाकडे दिलेल्या औषधांची रजिस्टरवर नोंदणी करणे तर दुसऱ्याकडे औषध वितरणाची जबाबदारी आहे. सकाळी ८ ते दुपारी २ अशी कामाची वेळ आहे. परंतु या दोन्ही फार्मासिस्टचा मनमानी कारभार सुरू आहे. हे दोघेही औषध वितरणाचे काम मुश्ताक पठाण या सफाई कर्मचाऱ्याकडे सोपवून कार्यालयीन वेळेत आपले खासगी काम करतात. सूत्रानुसार, अनेकवेळा पठाण यांच्याकडून चुकीचे औषध दिले गेले. याच्या तोंडी तक्रारीही झाल्या आहेत. तरीही हा प्रकार सर्रास सुरू आहे.

असे केले ‘स्टिंग आॅपरेशन’
‘लोकमत’ला मिळालेल्या तक्रारीवरून मंगळवार ७ मार्च रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास प्रस्तुत प्रतिनिधीने त्वचा व गुप्त रोग विभागाला भेट दिली. येथे उपचारासाठी आलेल्या एका ओळखीच्या रुग्णाच्या औषधांचे प्रिस्क्रिप्शन सहा क्रमांकाच्या औषध वितरण खिडकीत दिले. येथे मुश्ताक पठाण नावाचा सफाई कर्मचारी औषध वितरित करीत होता. त्याला फार्मासिस्ट कुठे आहे, असे विचारताच तो भडकला. मीच फार्मासिस्ट आहे असे सांगून, रागाने औषध दिले. गुरुवार ९ मार्च रोजी पुन्हा औषध वितरणाच्या खिडकीवर रुग्णांना औषध वितरित करताना पठाण होता.

अडीच वर्षांपासून सफाई कर्मचारीच वाटत आहे औषधे
त्वचा व गुप्त रोग विभागापासून काही अंतरावर असलेली औषध वितरण खिडकी क्रमांक सहा सकाळी ९ वाजताच्या सुमारास फार्मसिस्ट मानकर उघडतो. काही वेळ थांबतो व सफाई कर्मचारी पठाण याला खिडकीवर बसवून निघून जातो. दुसरे फार्मसिस्ट सोनपिपरे हे मानकर आपल्या जागेवर बसत नाही म्हणून तेही आपल्या जागेवर बसत नाही. सुमारे अडीच वर्षांपासून पठाणच औषधांचे वितरण करीत असल्याची माहिती आहे.

वरिष्ठांना माहीत
असूनही दुर्लक्ष
त्वचा व गुप्त रोग विभागाच्या अनेक वरिष्ठांना याची माहिती आहे. परंतु त्यांच्या संमतीमुळेच हा प्रकार सुरू असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, खिडकीवरून चुकीचे औषध दिले जात असल्याच्या काही रुग्णांनी तोंडी तक्रारीही केल्याचे समजते. परंतु विभाग प्रमुखांनी याला कधीच गंभीरतेने घेतले नसल्याची माहिती आहे.

Web Title: 'Pharmacist' becomes clean worker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.