नागपुरात ईव्हीएमची पहिल्या टप्प्यातील तपासणी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 08:05 PM2019-09-04T20:05:05+5:302019-09-04T21:04:50+5:30

भारत निवडणूक आयोग यांचे निर्देशानुसार विधानसभा निवडणुकीसाठी मतदान यंत्राची पहिल्या टप्प्यातील तपासणी ३० जुलै २०१९ ते ३१ ऑगस्ट २०१९ या कालावधीत भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या प्राधिकृत इंजिनिअरद्वारे पूर्ण करण्यात आली.

Phase-First EVM inspection completed in Nagpur | नागपुरात ईव्हीएमची पहिल्या टप्प्यातील तपासणी पूर्ण

नागपुरात ईव्हीएमची पहिल्या टप्प्यातील तपासणी पूर्ण

Next
ठळक मुद्देमान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमक्ष अभिरुप मतदान

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. नागपूर जिल्ह्यात एकूण १२ मतदारसंघात ईव्हीएम व व्हीव्हीपॅटद्वारे मतदान होणार आहे. जिल्ह्यात पूर्वी न वापरण्यात आलेल्या ईव्हीएमचा वापर केला जाणार आहे.
नागपूर जिल्ह्यात बीयु १७१०, सीयु १०५३ व व्हीव्हीपॅट १२१८ ही मे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, बंगळुरु या कंपनीची एम- ३ मतदान यंत्रे शिल्लक आहेत. या व्यतिरिक्त उत्तर प्रदेशातून बीयु ६४७०, सीयु ४८३० व व्ही व्ही पॅट ५१४० ही मे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, बंगळुरु या कंपनीची एम-३ मतदान यंत्रे प्राप्त झालेली आहेत. दोन्हीची साठवणूक नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती, कळमना येथील एपीएमसी वेअर हाऊसिंग गोडाऊन विंग एबीसी येथे करण्यात आलेली आहे.
भारत निवडणूक आयोग यांचे निर्देशानुसार विधानसभा निवडणुकीसाठी वरील सर्व मतदान यंत्राची पहिल्या टप्प्यातील तपासणी वरील गोदामात ३० जुलै २०१९ ते ३१ ऑगस्ट २०१९ या कालावधीत भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या प्राधिकृत इंजिनिअरद्वारे पूर्ण करण्यात आली. या दरम्यान या स्थळी राज्य व राष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे प्राधिकृत प्रतिनिधी उपस्थित होते.
या वेळी सर्व ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची स्वच्छता करुन त्यातील पूर्वीच्या निवडणुकीचा डाटा असल्यास तो क्लिअर करण्यात आला व त्याचे सर्व भाग, केबल, बटने व्यवस्थित असल्याचे तपासले गेले. त्यानंतर उत्पादक कंपनीद्वारे ठरवून दिलेल्या मानक कार्यप्रणालीनुसार कंपनीच्या इंजिनिअरद्वारे सर्व ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची योग्यतेबाबत तपासणी करण्यात आली. या तपासणी दरम्यान त्रुटी आढळलेल्या ईव्हीएम व व्हीव्हीपॅट वेगळे काढून ठेवण्यात आलेले असून उत्पादक कंपनीस परत पाठविले जातील.
आयोगाच्या निर्देशानुसार राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत ५ टक्के मतदान यंत्रांवर व्हीव्हीपॅट वापरुन अभिरुप मतदान करणे आवश्यक आहे. यात एक टक्के मतदान यंत्रांवर १२०० मते, २ टक्के मतदान यंत्रावर १००० मते व २ टक्के मतदान यंत्रांवर ५०० मते टाकून मतदान करण्यात आले. अभिरुप मतदानाचे शेवटी व्ही व्ही पॅट मधील पेपरस्लीपची मतमोजणी करुन त्यातील निकाल कंट्रोल युनिट मधील मतमोजणीच्या निकालासोबत पडताळून पाहण्यात आला. ही पडताळणी राज्य व राष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमक्ष करण्यात आली. अभिरुप मतदान ३ सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी ८ वाजता सुरु करण्यात आले. मतदान यंत्रेही प्रतिनिधींच्या समक्ष निवडण्यात आली. प्रतिनिधींना स्वत: मॉक पोल करण्याची मुभा देण्यात आली.
जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रक्रियेची पाहणी केली. मतदान यंत्रांचे मॉक पोल पोलीस सुरक्षेत नागपूर एपीएमसी वेअरहाऊसिंग गोडाऊन, विंग सी, पं.जवाहरलाल नेहरु मार्केट यार्ड, कळमना, नागपूर येथे ३ व ४ सप्टेंबर रोजी पूर्ण करण्यात आले आहे. पडताळणीची पूर्ण प्रक्रिया जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल यांचे मार्गदर्शनात पूर्ण करण्यात आली.

 

Web Title: Phase-First EVM inspection completed in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.