दीक्षाभूमीवर घडणार जागतिक बुद्ध संस्कृतीचे दर्शन
By admin | Published: February 13, 2017 09:43 PM2017-02-13T21:43:30+5:302017-02-13T21:43:30+5:30
दरवर्षी प्रमाणे यंदाही दीक्षाभूमीवर बुद्ध महोत्सव आयोजित करण्यात आला असून यात जागतिक बुद्ध संस्कृतीचे
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 13 - दरवर्षी प्रमाणे यंदाही दीक्षाभूमीवर बुद्ध महोत्सव आयोजित करण्यात आला असून यात जागतिक बुद्ध संस्कृतीचे दर्शन घडणार आहे. २२ ते २६ फेब्रुवारी दरम्यान चालणाऱ्या या महोत्सवात भारतीय लोकनृत्यासह चीनी गीत, संगीत व नृत्याची मेजवानी नागपूरकर रसिकांना अनुभवता येणार आहे. नागपूर बुद्धिस्ट सेंटरतर्फे आणि प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक
समिती दीक्षाभूमी, नागार्जुन टेनिंग इन्स्टिट्युट नागलोक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन आॅफ इंजिनियर्स (बानाई) , बोशान झेंगझुऐ टेंपल शांगडोन चीन आणि नॅशनल फिल्म आर्टिव्ह आॅफ इंडिया यांच्या सहकार्याने बुद्ध महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. येत्या २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता चीनमधील भदंत, रेन दा यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येईल. धम्मचारी लोकमित्र आणि डॉ. यो (तायवान) हे प्रमुख पाहुणे राहतील. यानंतर२३ ते २६ पर्यंत रत्नमाला व्याख्यानमाला होईल. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मानलेले तीन गुरू यांच्यावर व्याक्यान होईल. पहिल्या दिवशी संत कबीर यांच्यावर प्रसिद्ध विचारवंत कंवल भारती, क्रांतीसूर्य ज्योतीबा फुले यांच्यावर सुशीला मोराले आणि तथागत गौतम
बुद्ध यांच्यावर धम्मचारी सुभूती (इंग्लंड) हे मार्गदर्शन करतील. २३ ला विविध राज्य व स्थानिक कलाकार लोकनृत्य व कला सादर करतील. २४ ला महाकवि वामनदादा कर्डक यांनी लिहिलेल्या गजलांचा कार्यक्रम होईल. डॉ. संजय मोहोड आणि त्यांची चमू हे हा कार्यक्रम सादर करतील. २५ ला चान टी म्युझीकल हा चीनी कलाकरांची निशेष प्रस्तुती असलेला कार्यक्रम सादर केला जाईल. २६ ला सायंकाळी ७ वाजता समारोप होईल. यावेळी मुंबईचे आयकर आयुक्त सुबचन राम हे प्रमुख अतिथी राहतील. याशिवाय २५ ला युवकांसाठी कार्यशाळा होईल. २६ ला बुद्धीला चालना देणारे कार्यक्रव तसेच धम्मचारी नागकेतू यांची ध्यान कार्यशाळा होईल.
या महोत्सवाला येणाऱ्या रसिकांसाठी फुड झोन, किड्स झोन, बुक्स आमि आर्टिफक्टस् स्टॉल सुद्धा राहतील.
फिल्म फेस्टीवल व कला प्रदर्शन
या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे फिल्म फेस्टीव्हल व कला प्रदर्शन हे आहे. नॅशनल फिल्म आर्टिव्हज आॅफ इंडियाद्वारा पुरस्कृत तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित वृत्तचित्र व फिल्म दाखविण्यात येतील. याशिवाय प्रख्यात चीन व भारतीय कलाकारांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येईल. या कलावंतांशी संवाद सुद्धा साधता