प्रीतीसोबत काढले फोटो, आता तेच चौकशी अधिकारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 11:47 PM2020-06-15T23:47:13+5:302020-06-15T23:48:48+5:30

समाजसेवेच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्या प्रीती दासविरोधात पोलीस आयुक्तांच्या निर्देशांनंतर गंभीर गुन्हे दाखल होत आहेत. या प्रकरणात आणखी एक पैलू समोर आला आहे. ज्या पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत प्रकरणाची चौकशी सुरू आहे, त्यांच्यासोबतच तिने काढलेले छायाचित्र ‘सोशल मीडिया’मध्ये ‘व्हायरल’ होत आहे. ज्या अधिकाऱ्यांनी प्रीती दाससमवेत छायाचित्र काढून घेतले, त्यांच्या अंतर्गत होणारी चौकशीची विश्वासार्हता किती राहील, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

Photo taken with Preeti, now the same investigating officer! | प्रीतीसोबत काढले फोटो, आता तेच चौकशी अधिकारी!

प्रीतीसोबत काढले फोटो, आता तेच चौकशी अधिकारी!

googlenewsNext
ठळक मुद्देठाणेदारांचे छायाचित्र ‘व्हायरल’ : चौकशीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : समाजसेवेच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्या प्रीती दासविरोधात पोलीस आयुक्तांच्या निर्देशांनंतर गंभीर गुन्हे दाखल होत आहेत. या प्रकरणात आणखी एक पैलू समोर आला आहे. ज्या पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत प्रकरणाची चौकशी सुरू आहे, त्यांच्यासोबतच तिने काढलेले छायाचित्र ‘सोशल मीडिया’मध्ये ‘व्हायरल’ होत आहे. ज्या अधिकाऱ्यांनी प्रीती दाससमवेत छायाचित्र काढून घेतले, त्यांच्या अंतर्गत होणारी चौकशीची विश्वासार्हता किती राहील, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
‘सोशल मीडिया’वर ‘व्हायरल’ होत असलेला फोटो हा काही आठवड्यांअगोदर एका सत्कार कार्यक्रमातील असल्याची माहिती आहे. आरोपी प्रीती दासने तक्रार दाखल झाल्यानंतर आठवडाभराने म्हणजेच १३ जून रोजी पाचपावली ठाण्यात येऊन आत्मसमर्पण केले. परंतु पाचपावलीचे इन्चार्ज किशोर नगराळे यांनी तिच्यासमवेत छायाचित्र काढले होते. त्यांच्या अंतर्गतच असणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून निष्पक्ष चौकशी कशी होईल, अशी शंका उपस्थित होत आहे. यासोबतच प्रीतीसमवेत छायाचित्रात दिसणारे लकडगंजचे ठाणेदार नरेंद्र हिवरे यांच्या ठाण्यात दाखल प्रकरणाची चौकशी किती विश्वासार्ह असेल, यावरदेखील चर्चा होत आहे.
काही लोक प्रीतीच्या विरोधात अगोदरदेखील पाचपावली, लकडगंज व इतर पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार घेऊन गेले होते. पाचपावलीच्या गुड्डू तिवारीसोबत मैत्री करून लग्नाचे आमिष दाखवून प्रीतीने लाखो रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार एका महिन्यापासून करण्यात येत होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतरच ४ जून रोजी तक्रार नोंदविण्यात आली. तर लकडगंज ठाण्याअंतर्गत जुनी मंगळवारी निवासी सुनील पौनिकरच्या आत्महत्येचे प्रकरण सहा महिने जुने आहे. या प्रकरणातील ‘सुसाईड नोट’देखील सहा महिन्यांपूर्वीच समोर आली होती. त्यानंतरदेखील प्रीती व तिच्या सहकाऱ्यांविरोधात प्रकरण न नोंदविले जाणे हे पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित करणारे आहे. ६ जून रोजी लकडगंजमध्ये प्रीती व तिच्या सहकाऱ्यांविरोधात मृत सुनीलला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचे प्रकरण नोंदविण्यात आले. या प्रकरणात हलगर्जीपणा का झाला, याची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी समोर येत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार रविवारी आणि सोमवारी काही महिला भेटण्यासाठी गेल्या होत्या. यातील दोन महिला चांगल्याच वादग्रस्त असल्याची माहिती आहे. त्यांच्यावर गुन्हाही दाखल असल्याची माहिती आहे. पोलीस अशा महिलांना प्रीतीला भेट कशी घेऊ देतात, त्यामागे कोणता उद्देश आहे, हे स्पष्ट झाले नाही. दरम्यान, प्रीतीने एका यूट्यूबवर बातमी चालविणाºयाच्या नावाने रक्कम उकळल्याचे पुढे आले आहे. तिचे २० लाखांचे खंडणी प्रकरण चर्चेला आले आहे. तिला लकडगंज प्रकरणात जामीन मिळाल्याने मंगळवारी या संबंधाने मोठी घडामोड होण्याची सूत्रांची माहिती आहे. काही सामाजिक संघटनांनी हे प्रकरण उचलून धरण्याचीही तयारी चालवली आहे.

जामीन मंजूर
विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र चर्चेत असलेली महाठग प्रीती दास हिला सत्र न्यायालयाने आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या प्रकरणात सोमवारी सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला. या प्रकरणात तिच्याविरुद्ध लकडगंज पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
सुनील पौनीकर असे मयताचे नाव होते. त्याने २७ नोव्हेंबर २०१९ रोजी आत्महत्या केली. त्याने मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीवरून पोलिसांनी दासला आरोपी केले. परंतु, त्या चिठ्ठीवरून दासने पौनीकरला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचे दिसून आले नाही. तसेच, पोलिसांनी दासविरुद्ध अन्य ठोस पुरावे सादर केले नाहीत. करिता, दासचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्यात आला. दासतर्फे अ‍ॅड. अशोक रघुते व अ‍ॅड. उदय डबले यांनी कामकाज पाहिले.

Web Title: Photo taken with Preeti, now the same investigating officer!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.