नागपुरात इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्राचे फिजिकल वेरिफिकेशन सोमवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 01:53 AM2018-05-05T01:53:45+5:302018-05-05T01:53:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निवडणूक आयोगाने इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्राचे मोबाईल अॅपचा वापर करुन शंभर टक्के ‘फिजिकल व्हेरिफिकेशन’ करण्याच्या सूचना दिल्या आहे. त्यानुसार जिल्ह्यातील फिजिकल व्हेरिफिकेशन ७ मे रोजी सकाळी १० वाजता सिव्हील लाईन्स परिसरातील प्रशासकीय इमारत क्रमांक २ येथे करण्यात येणार आहे.
इलेक्ट्रानिक्स मतदान केंद्र्राच्या फिजिकल व्हेरिफिकेशनच्या वेळी सर्व राजकीय पक्षाच्या प्राधिकृत प्रतिनिधींनी सकाळी १० वाजतापासून उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले आहे.
निवडणूक आयोगाने नागपूर जिल्ह्यातील उपलब्ध असलेल्या एमआय (२०००-२००५) इलेक्ट्रानिक्स मतदान यंत्राचे मोबाईल अॅपचा वापर करुन शंभर टक्के व्हेरिफिकेशन करण्याच्या निर्देशानुसार प्रशासकीय इमारत क्रमांक-२ येथील चौथ्या मजल्यावर एमआयईव्हीएमएस असलेल्या गोदाम कक्षामध्ये व्हेरिफिकेशन होणार आहे. सदर गोदाम उघडण्याच्या वेळी तसेच बंद करण्याच्या वेळी सुध्दा राजकीय पक्षाच्या प्राधिकृत प्रतिनिधींनी उपस्थित राहावे, असे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी कळविले आहे.