कचरा उचला, अन्यथा अधिकाऱ्यांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:08 AM2020-12-24T04:08:41+5:302020-12-24T04:08:41+5:30
कार्यकारी महापौरांचा इशारा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरातील अनेक भागांमध्ये कचऱ्याचे ढिगारे पडून आहेत. घराघरातून कचरा संकलित केला ...
कार्यकारी महापौरांचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील अनेक भागांमध्ये कचऱ्याचे ढिगारे पडून आहेत. घराघरातून कचरा संकलित केला जावा यासाठी मनपाने दोन एजन्सी नियुक्त केल्या आहेत. स्वच्छतेमध्ये कुठल्याही प्रकारची कुचराई दिसून आल्यास संबंधित सफाई कर्मचाऱ्यावर कारवाई केली जाते. मात्र संबंधित अधिकारी तेवढेच जबाबदार असल्याने त्यांनाही दंड ठोठावण्यात येईल, असा इशारा कार्यकारी महापौर संदीप जोशी यांनी दिला.
कचरा संकलन आणि त्याचे व्यवस्थापन व्हावे यासाठी मनपाद्वारे बीव्हीजी आणि एजी एन्व्हायरो या दोन एजन्सी नियुक्त करण्यात आलेल्या आहेत. मात्र तरीही शहरातील काही ठिकाणे कचराघर बनत चालले आहे. प्रशासनाने उदासीनपणा आणि कामचुकारपणा सोडून प्रामाणिकपणे काम करणे गरजेचे आहे. त्यामुळे यासंदर्भात तातडीने संबंधित अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी ओळखून काम करावे अन्यथा कारवाईला सामोरे जावे, असाही इशारा कार्यकारी महापौर संदीप जोशी यांनी दिला आहे.