तीर्थक्षेत्रांचा विक ास होणार?
By admin | Published: October 27, 2014 12:30 AM2014-10-27T00:30:20+5:302014-10-27T00:30:20+5:30
तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भेदभाव नसतो. सर्व जाती-धर्मांचे लोक दर्शनाला येतात. परंतु समतेचा संदेश देणाऱ्या तीर्थक्षेत्र विकासासाठी निधी वाटप करताना भेदभाव होत आहे. त्यामुळे सुविधांची गरज
भेदभाव कशासाठी : ठराविक तीर्थस्थळांना वारंवार निधी
नागपूर : तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भेदभाव नसतो. सर्व जाती-धर्मांचे लोक दर्शनाला येतात. परंतु समतेचा संदेश देणाऱ्या तीर्थक्षेत्र विकासासाठी निधी वाटप करताना भेदभाव होत आहे. त्यामुळे सुविधांची गरज असूनही जिल्ह्यातील अनेक तीर्थस्थळांचा विकास रखडला आहे.
वर्षभरात १ लाखाहून अधिक लोक दर्शनासाठी येतात, अशी शिफारस तहसीलदारांनी केल्याने गत काळात ३९४ तीर्थक्षेत्र वा यात्रा स्थळांचा जिल्हा प्रशासनाने ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्रात समावेश केला आहे. शासनाच्या नवीन धोरणानुसार आता जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाची शिफारस आवश्यक आहे. ग्रामस्थांच्या मागणीनुसार पर्यटन स्थळाच्या क वर्ग समावेशासाठी सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषदेकडून नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठविले जातात. त्यानुसार अशा स्थळांच्या विकासासाठी शासनाकडून दरवर्षी निधी उपलब्ध केला जातो.
क वर्ग समावेशासाठी निकष असले तरी पदाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे निधी वाटप करताना जिल्ह्यातील काही ठराविक तीर्थक्षेत्रांनाच झुकते माप दिले जाते.काही तीर्थस्थळांना वारंवार विकास निधी देण्यात आला आहे. दुसकरीडे मागणी करूनही काहींना निधी मिळालेला नाही. पर्यटन वा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता, पथदिवे, पिण्याची पाण्याची सुविधा, शौैचालय, यात्री निवास, सौैंदर्यीकरण आदी सुविधांसाठी दरवर्षी ४ ते ५ कोटींचा निधी उपलब्ध केला जातो. परंतु निधी वाटपात भेदभाव होत असल्याने काही स्थळांचा विकास थांबला आहे. याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.(प्रतिनिधी)