मराठी साहित्य चळवळीचा आधारस्तंभ कोसळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 11:20 PM2018-03-30T23:20:17+5:302018-03-30T23:20:26+5:30
१९६० नंतर महाराष्ट्रात जे वैचारिक वादळ उठले त्यात वादळाचे वंशज डॉ. गंगाधर पानतावणे यांची महत्त्वाची भूमिका होती. या वादळाने घराघरातील प्रतिभावंतांना जागे केले. पानतावणे यांच्या जाण्याने मराठी साहित्य चळवळीचा आधारस्तंभ कोसळला आहे, अशी संवेदना डॉ. मधुकरराव वासनिक पीडब्लूएस कॉलेजचे प्राचार्य डॉ. यशवंत पाटील यांनी व्यक्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : १९६० नंतर महाराष्ट्रात जे वैचारिक वादळ उठले त्यात वादळाचे वंशज डॉ. गंगाधर पानतावणे यांची महत्त्वाची भूमिका होती. या वादळाने घराघरातील प्रतिभावंतांना जागे केले. पानतावणे यांच्या जाण्याने मराठी साहित्य चळवळीचा आधारस्तंभ कोसळला आहे, अशी संवेदना डॉ. मधुकरराव वासनिक पीडब्लूएस कॉलेजचे प्राचार्य डॉ. यशवंत पाटील यांनी व्यक्त केली. कॉलेजात आयोजित पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या आदरांजली सभेत ते बोलत होते. याप्रसंगी मराठी विभाग प्रमुख डॉ. इंद्रजीत ओरके म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनानंतर त्यांच्या विचारांना वैश्विक स्तरावर सन्मानित करण्याचे महान कार्य डॉ. गंगाधर पानतावणे यांनी केले. त्यांनी आपल्या लेखणीद्वारे कष्टकरी, वंचितांच्या जीवनाचे अंतरंग अस्मितादर्शमधून मांडले. त्यांच्या निधनाने समाजाची कधीही न भरून निघणार हानी झाली आहे. याप्रसंगी डॉ. प्रज्ञा बागडे, प्रा. सुदेश भोवते, सुरेश पाटील यांनीही आदरांजली अर्पण केली.