‘त्या’ बांगलादेशी वैमानिकाचा नागपुरात हृदयविकाराने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2021 07:47 PM2021-08-30T19:47:57+5:302021-08-30T19:48:16+5:30

Nagpur News वैमानिकाला हृदयविकाराचा त्रास सुरू झाल्याने बांगलादेशच्या विमानाचे नागपूर विमानतळावर शुक्रवारी ‘इमर्जन्सी लॅण्डिंग’ करण्यात आले. वैमानिकावर किंग्सवे हॉस्पिटलवर उपचार सुरू असताना सोमवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला.

The pilot of Bangladesh died of a heart attack in Nagpur | ‘त्या’ बांगलादेशी वैमानिकाचा नागपुरात हृदयविकाराने मृत्यू

‘त्या’ बांगलादेशी वैमानिकाचा नागपुरात हृदयविकाराने मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देनागपूर विमानतळावर झाले होते इमर्जन्सी लॅण्डिंग

लोकमत न्यूज नेटवर्क  

नागपूर : वैमानिकाला हृदयविकाराचा त्रास सुरू झाल्याने बांगलादेशच्या विमानाचे नागपूर विमानतळावर शुक्रवारी ‘इमर्जन्सी लॅण्डिंग’ करण्यात आले. वैमानिकावर किंग्सवे हॉस्पिटलवर उपचार सुरू असताना सोमवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. ‘बिमान बांगलादेश’च्या प्रवक्त्या ताहेरा खांडकर यांनी ही माहिती दिली. (The pilot of Bangladesh died of a heart attack in Nagpur)

'बिमान बांगलादेश एअरलाइन्स'चे हे विमान मस्कतहून ढाक्याला रायपूरवरून जात होते. विमानात एकूण १२६ प्रवासी होते. याच दरम्यान पायलट नवशाद (४५) यांना हृदयविकाराचा त्रास सुरू झाला. विमानाने तात्काळ कोलकाता एटीसीला संपर्क केला. तसेच, विमानातील परिस्थितीची जाणीव करुन दिली. पायलटच्या प्रकृतीची माहिती मिळताच एटीसीने विमानाचे नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लॅण्डिंग करण्याचे आदेश दिले. शुक्रवारी सकाळी ११.४० वाजताच्या सुमारास विमान तातडीने नागपूर विमानतळावर उतरवण्यात आले. पायलटला उपचारासाठी किंग्जवे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

उपचारादरम्यान आज सकाळी १० वाजता त्यांचा मृत्यू झाला. याची माहिती रुग्णालयाने ‘बिमान बांग्लादेश’ व त्यांच्या नातेवाईकांना दिली. नवशाद यांची बहीण हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या. त्यांचा मृतदेह बांगलादेशला परत आणण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे.

Web Title: The pilot of Bangladesh died of a heart attack in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू