बांगलादेशी विमानाचा पायलट व्हेंटिलेटरवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:11 AM2021-08-29T04:11:39+5:302021-08-29T04:11:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : बांगलादेशी विमानाचे मुख्य पायलट नौशाद अताऊल कयूम यांच्यावर नागपुरात उपचार सुरू आहेत. ते सध्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बांगलादेशी विमानाचे मुख्य पायलट नौशाद अताऊल कयूम यांच्यावर नागपुरात उपचार सुरू आहेत. ते सध्या व्हेंटिलेटरवर असून त्यांची प्रकृती नाजूक असल्याचे सांगितले जाते.
बांगलादेश एअरलाईन्सचे विमान बीजी-२२ चे मुख्य पायलट नौशाद अताऊल कयूम यांना शुक्रवारी विमान उडवताना अचानक हार्टअटॅक आला होता. त्यामुळे हे विमान नागपूर विमानतळावर आपत्कालीन परिस्थितीत उतरवण्यात आले. त्यानंतर पायलटला किंग्सवे रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयाचे क्रिटिकल केअर स्पेशालिस्ट डाॅ. वीरेंद्र बेलेकर यांनी सांगितले की, सीटी स्कॅनच्या रिपोर्टनुसार मेंदूच्या एका विशेष भागात रक्त वाहिल्यामुळे हार्टअटॅक आला. सध्या त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती नाजूक आहे. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी बांगलदेश एअरलाईन्सचे व्यवस्थापक शनिवारी रुग्णालयात पोहोचले. तसेच पायलट नौशाद यांची बहीण अमेरिकेत असते. त्यांच्याशीही फोनवर चर्चा झाली. रुग्णालय सूत्रानुसार पायलट नौशाद यांना अनियंत्रित ब्लड प्रेशरचा त्रास आहे. ते मधुमेहाचे रुग्णही आहेत. त्यांची मेडिकल हिस्ट्री पाहता ते आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देत नसल्याचे दिसून येते.