दाभ्यातील आठ सोसायट्यांमध्ये पाइपलाइन पोहोचलीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:09 AM2021-07-29T04:09:46+5:302021-07-29T04:09:46+5:30

- नागरिक पिण्यासाठी आरओ आणि वापरासाठी टँकरच्या पाण्यावरच निर्भर सय्यद मोबीन / लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महानगरपालिकेच्या दाभा ...

The pipeline did not reach the eight societies in Dabha | दाभ्यातील आठ सोसायट्यांमध्ये पाइपलाइन पोहोचलीच नाही

दाभ्यातील आठ सोसायट्यांमध्ये पाइपलाइन पोहोचलीच नाही

Next

- नागरिक पिण्यासाठी आरओ आणि वापरासाठी टँकरच्या पाण्यावरच निर्भर

सय्यद मोबीन / लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महानगरपालिकेच्या दाभा येथील प्रभाग क्रमांक १२ मधील आठ सोसायट्यांमध्ये अजूनही पाइपलाइन पोहोचली नसल्याने, नागरिकांना पिण्यासाठी आरओ आणि वापरासाठी टँकरवर विसंबून राहावे लागत आहे.

हे क्षेत्र मनपाच्या अखत्यारित येण्याला बराच काळ लोटला आहे. मनपा क्षेत्रातील नव्या भागात पाणीपुरवठा करण्यासाठी जलकुंभांच्या निर्मितीसह पाइपलाइन टाकण्याची जबाबदारी अमृत योजनेंतर्गत वेपकॉस नामक एका खासगी कंपनीला देण्यात आली आहे. कंपनीकडून ही कामे २०२० पर्यंत पूर्ण करणे अपेक्षित होते, परंतु २०२१चे सहा महिने लोटल्यानंतरही काम झालेले नाही. विशेष म्हणजे, नगरसेवकांनीही कंपनीकडून विश्वासपूर्ण कामे केली जात नसल्याच्या तक्रारी होत्या. यावर आठ महिन्यांपूर्वी महापौर दयाशंकर तिवारी यांनी कंपनीला संबंधित क्षेत्रातील नगरसेवकांसोबत समन्वय साधण्याचे निर्देश दिले होते. मात्र, अजूनही कंपनी आपल्या जुन्याच वृत्तीने काम करत असल्याचा आरोप नगरसेवकांचा आहे.

फॉलोअप घेत आहे

अमृत योजनेंतर्गत २०२० पर्यंत दाभा क्षेत्रातील ११ सोसायट्यामध्ये पाइपलाइन पोहोचणे गरजेचे होते. दरम्यान, सतत संपर्क साधत डीपीडीसीअंतर्गत गुरुदत्त सोसायटी, संत ताजुद्दीन सोसायटी, मेट्रो ऑरेंज सिटी सोसायटीमध्ये पाइपलाइन टाकण्यात आली. उर्वरित आठ सोसायट्यांमध्ये पाइपलाइनचे काम झाले नाही. सुखसागर सोसायटीमध्ये जलकुंभाचे काम अत्यंत मंद वेगाने सुरू आहे. सर्वच सोसायटींमध्ये पाइपलाइन टाकली जावी, यासाठी सातत्याने फाॅलोअप घेत आहे.

- दर्शन स्वानंद धवड़, नगरसेविका, प्रभाग क्रमांक १२

या सोसायट्यांमध्ये पाइपलाइन पोहोचली नाही

दाभा येथील सुखसागर सोसायटी, नागपूर विजय सोसायटी, वैष्णव माता कॉलनी, आकांक्षी सोसायटी, नीता हाउसिंग सोसायटी, मेट्रो सिटी सोसायटी आदींमध्ये पाइपलाइन अजूनही टाकण्यात आलेली नाही.

आरोग्यावर पडतोय प्रभाव

पाणीपुरवठ्याची व्यवस्था नसल्याने अनेक नागरिकांना आरओचे पाणी पिणे आता सवयीचा भाग झाला आहे. मात्र, सामान्य पाणी प्यायल्यावर त्यांची प्रकृती ढासळत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहे. त्यामुळे नागरिकांनी लवकरात लवकर पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.

..............

Web Title: The pipeline did not reach the eight societies in Dabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.