पिटुकले पक्षी लुप्त हाेण्याचा मार्गावर; स्टेट ऑफ इंडियाज बर्डस् चा अहवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2023 06:07 AM2023-08-26T06:07:29+5:302023-08-26T06:07:29+5:30
अहवाल तीस हजारांहून अधिक पक्षी निरीक्षकांच्या निरीक्षणावर आधारित
राजेश शेगाेकार
लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : सर्वदूर आढळणाऱ्या पाणभिंगरी, कंठेरी चिखल्या, मोठा करवानक तसेच आर्क्टिकमधून स्थलांतरित लिटल टर्न अशा पक्ष्यांच्या प्रमुख प्रजातींची संख्या ५० ते ८० टक्के घटली असून वेळीच दखल न घेतल्यास हे देखणे छाेटे पक्षी लुप्त होतील, अशी भीती स्टेट ऑफ इंडियाज बर्डस्च्या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. तीस हजारांहून अधिक पक्षी निरीक्षकांच्या निरीक्षणावर आधारित हा अहवाल आहे.
याबाबत व्यक्त केली चिंता
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी या प्रमुख स्वयंसेवी संस्थेसह १३ सरकारी आणि गैर-सरकारी संस्थांनी तयार केलेला २०२० नंतरचा हा दुसरा देशव्यापी अहवाल आहे. यात सहा प्रमुख निरीक्षणे नमूद असून समुद्रकिनारे आणि गवताळ प्रदेशात आढळणाऱ्या पक्ष्यांबद्दल अधिक चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
प्रमुख कारणे
सिंचन प्रकल्प, वाळू उत्खनन, मानवी हस्तक्षेप आणि वाढते प्रदूषण यामुळे नदीपात्रांजवळचा नैसर्गिक अधिवास धोक्यात आला.
हे पक्षी धाेक्यात
- कंठेरी चिखल्या
- माेठा करवानक
- पाण भिंगरी
- लिटल टर्न