पीडितेची अद्याप वैद्यकीय तपासणीच नाही

By admin | Published: April 22, 2017 03:01 AM2017-04-22T03:01:00+5:302017-04-22T03:01:00+5:30

आमदार निवासाच्या खोलीत झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित युवतीची गुन्हा दाखल होऊन तब्बल चार दिवस झाले

The plague does not have a medical examination yet | पीडितेची अद्याप वैद्यकीय तपासणीच नाही

पीडितेची अद्याप वैद्यकीय तपासणीच नाही

Next

खळबळजनक बाब उघड

नरेश डोंगरे   नागपूर
आमदार निवासाच्या खोलीत झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित युवतीची गुन्हा दाखल होऊन तब्बल चार दिवस झाले तरी अद्याप वैद्यकीय तपासणी झाली नसल्याची खळबळजनक बाब पुढे आली आहे. या संदर्भात गिट्टीखदान ठाण्यातून माहिती देण्याचे टाळण्यात आल्याने हे प्रकरण आता आणखीनच गंभीर बनले आहे. बलात्काराची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल होताच सर्वप्रथम पीडित महिला किंवा मुलीची वैद्यकीय तपासणी करवून घेतली जाते.प्रारंभीपासूनच अनेक शंका निर्माण करणाऱ्या

या संवेदनशील प्रकरणात प्रारंभी तर वैद्यकीय तपासणी झालीच नाही. मात्र, १७ एप्रिलला गुन्हा दाखल झाल्यानंतर आणि १८ तारखेला पीडित युवती, आरोपी समोरासमोर असतानादेखील पोलिसांनी पीडित युवतीचे मेडिकल करवून घेतले नाही. १९ एप्रिलला पोलिसांनी आरोपी मनोज भगत आणि रजत मद्रे या दोघांना अटक करून त्यांचा पीसीआरही मिळवला. शुक्रवारी त्यांच्या पीसीआरचा शेवटचा दिवस आहे. शनिवारी त्यांना कोर्टात हजर करून पोलीस पुन्हा वाढीव पीसीआरची मागणी करणार आहे. गुन्हा दाखल होऊन, आरोपी अटक करून आता ९६ तासांचा कालावधी झाला मात्र पीडितेची अद्याप वैद्यकीय तपासणी करण्यात आली नाही. या संबंधाने गिट्टीखदान पोलिसांशी संपर्क केला असता त्यांच्याकडून माहिती देण्याचे टाळले जाते. एका अधिकाऱ्याने मात्र आॅफ द रेकॉर्ड अनामिक कारणामुळे वैद्यकीय तपासणी करण्यात आली नसल्याचे सांगितले आहे.
विशेष म्हणजे, या प्रकरणात पोलिसांनी प्रारंभापासूनच ढिसाळपणा केल्याचा गंभीर आरोप राज्य महिला आयोगाच्या सदस्य निता ठाकरे यांनी लावला आहे. आपण पोलिसांच्या तपासावर समाधानी नसल्याची स्पष्ट प्रतिक्रिया त्यांनी आज लोकमतशी बोलताना नोंदवली आहे. तसा प्राथमिक अहवालही आपण वरिष्ठांकडे पाठविल्याचे त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)

७२ तासात २० वेळा बलात्कार
१४ एप्रिलला सकाळी ७.३० वाजता युवती घरून बाहेर आल्यानंतर आरोपी भगतने पहिल्यांदा तिच्यावर इको स्पोर्ट (एमएच ३१/ ईए ५४०८) कारमध्ये आमदार निवासाच्या परिसरात शरीरसंबंध जोडले. त्यानंतर आरोपी रजत मद्रे पोहचला. त्यानंतर पुढच्या ७२ तासांच्या कालावधीत ३२० क्रमांकाच्या खोलीत दोघांनीही तब्बल २० वेळा युवतीवर बलात्कार केला. घरी नेऊन सोडल्याच्या एका तासानंतर भगतने पुन्हा युवतीच्या मोबाईलवर फोन करून शरीरसुखाची मागणी केल्याचे समजते.
 

Web Title: The plague does not have a medical examination yet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.