विमानात बिघाड, इंदूर विमान रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 12:39 AM2020-10-18T00:39:08+5:302020-10-18T00:43:12+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी इंदूरला जाणाऱ्या प्रवाशांनी बोर्डिंग पास मिळविल्यानंतर अनेक तासांपर्यंत मानसिक त्रास सहन करावा लागला. उड्डाणादरम्यान विमानात तांत्रिक बिघाड आल्यानंतर काही वेळातच उड्डाण रद्द करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी इंदूरला जाणाऱ्या प्रवाशांनी बोर्डिंग पास मिळविल्यानंतर अनेक तासांपर्यंत मानसिक त्रास सहन करावा लागला. उड्डाणादरम्यान विमानात तांत्रिक बिघाड आल्यानंतर काही वेळातच उड्डाण रद्द करण्यात आले. अनेक प्रयत्नानंतरही शनिवारी सायंकाळपर्यंत विमान दुरुस्त झाले नाही.
शनिवारी दुपारी १२.३० वाजता इंडिगो एअरलाईन्सचे विमान ६ई ७३२१ इंदूरहून नागपुरात पोहोचल्यानंतर काही वेळातच इंदूरला जाण्यासाठी तयार होते. जवळपास ४० प्रवाशांनी बोर्डिंग पास घेतला होता. ऑपरेशन एरियात विमानापर्यंत नेण्यासाठी बसमध्ये बसविण्यात आले. पण कारण न सांगता त्यांना बसमध्येच बसवून ठेवण्यात आले. काही वेळानंतर टर्मिनल बिल्डिंगच्या अराव्हयल लाऊंजमध्ये त्यांना नाश्ता देण्यात आला. दुपारी ३.३० वाजता विमान रद्द करण्यात आले. विमान रद्द करण्यावर कंपनीने खुलासा केला नाही. विमान रद्द झाल्याची सूचना विमानतळ व्यवस्थापनाला देण्यात आली नाही. शिवाय कंपनीचा एक दूरध्वनी क्रमांक बंद होता. अनेक प्रवाशांना रविवारच्या उड्डाणाचे तिकीट देण्यात आले आहे. कंपनी नागपूर-इंदूरदरम्यान एटीआर विमानाचे संचालन करते. त्याची क्षमता ७० सिटांची आहे