जागेअभावी एमआरओच्या हँगरबाहेर उभे आहे विमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2020 02:19 AM2020-08-30T02:19:40+5:302020-08-30T02:22:08+5:30
मिहान परिसरात एअर इंडियाच्या एमआरओबाहेर एक विमान उभे आहे. एमआरओच्या हँगरमध्ये पूर्वीच दोन विमाने उभी असल्याने या विमानाला आत घेता आले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मिहान परिसरात एअर इंडियाच्या एमआरओबाहेर एक विमान उभे आहे. एमआरओच्या हँगरमध्ये पूर्वीच दोन विमाने उभी असल्याने या विमानाला आत घेता आले नाही.
एमआरओमध्ये दोन हँगर आहेत. यामध्ये देखभाल व दुरुस्तीसाठी दोन विमाने पूर्वीपासूनच उभी आहेत. बाहेर उभे असलेले विमान शनिवार दुरुस्तीसाठी आले. पूर्वीच आत असलेल्या विमानांची दुरुस्ती झाल्यानंतरच या विमानाला आत घेतले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. शनिवारी एअर इंडियाचे बोईंग-७७७ विमान टीचरकरिता एमआरओमध्ये आणण्यात आले आहे. त्याची देखभाल व दुरुस्ती १० दिवस चालणार आहे. हे विमान मुंबई आणि दिल्लीहून यूएसएकरिता वंदे भारत अभियानांतर्गत चालविण्यात येत आहे. एमआरओच्या हँगरमध्ये जवळपास १० महिन्यापूर्वी देखभाल व दुरुस्तीसाठी आलेले बोईंग-७७७ उभे आहे. सुटे भाग उपलब्ध न झाल्याने विमानाची दुरुस्ती अजूनही झालेली नाही. याशिवाय अलीकडचे एक बोईंग-७७७ विमान हँगरमध्ये आणण्यात आले आहे. त्याच्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम सप्टेंबरच्या मध्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
तर बाहेरच उभी राहतील विमाने
अनेक दिवसापासून सुरू असलेले लॉकडाऊन आणि अनलॉकचा परिणाम कामावर झाला आहे. पूर्वीपासून हँगरमध्ये असलेल्या विमानाची दुरुस्ती अजूनही होऊ शकली नाही. आता पुन्हा कोरोना वाढत आहे. त्यामुळे एमआरओमधील काही कर्मचारी सुटीवर गेले आहे. त्यामुळे कामावर परिणाम होत आहे. अशीच स्थिती राहिल्यास विमान दुरुस्तीसाठी आल्यानंतर हँगरबाहेरच उभे ठेवावे लागेल, असे सूत्रांनी सांगितले.