यंदा ५ लाख १०० हेक्टरवर खरिपाचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 11:49 AM2020-04-28T11:49:57+5:302020-04-28T11:50:19+5:30

कृषी विभागाने यंदा जिल्ह्यात ५ लाख १०० हेक्टर कृषी क्षेत्रावर खरिपाचे नियोजन केले आहे. मागील वर्षीच्या साध्य झालेल्या खरिपाच्या क्षेत्रापेक्षा यंदा सुमारे २२ हजार हेक्टरने क्षेत्रात वाढ केली आहे. त्या दृष्टीने नियोजन केले आहे.

planning of crops on 5 lakh 100 hectares this year | यंदा ५ लाख १०० हेक्टरवर खरिपाचे नियोजन

यंदा ५ लाख १०० हेक्टरवर खरिपाचे नियोजन

Next

 



गोपालकृष्ण मांडवकर
लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कृषी विभागाने यंदा जिल्ह्यात ५ लाख १०० हेक्टर कृषी क्षेत्रावर खरिपाचे नियोजन केले आहे. मागील वर्षीच्या साध्य झालेल्या खरिपाच्या क्षेत्रापेक्षा यंदा सुमारे २२ हजार हेक्टरने क्षेत्रात वाढ केली आहे. त्या दृष्टीने नियोजन केले आहे.
नागपूर जिल्ह्याचे पीक लागवडीलायक क्षेत्र ६ लाख ३३ हजार २१२ हेक्टर आहे. त्यातील सर्वसाधारण खरिपाचे क्षेत्र ४ लाख ७९ हजार २०९ हेक्टर असल्याची नोंद कृषी विभागाकडे आहे. सरासरी पर्जन्यमान १,०३७ मिमी असून २०१९-२० मध्ये सरासरीपेक्षा ११४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या हंगामातही पाऊस चांगला राहणार असल्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे.

जिल्ह्यातील खरिपासाठी या हंगामात १ लाख ५ हजार ३०० हेक्टरवर तृणधान्याचे नियोजन केले आहे. मागील वर्षी ९७ हजार ५०० हेक्टर क्षेत्रफळावर भात, गहू, मका, ज्वारी अशा तृणधान्याचे उत्पादन घेण्यात आले होते. तर कडधान्यासाठी ६८ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर नियोजन केले आहे. मागील हंगामातही यासाठी एवढेच नियोजन असले तरी ५३ हजार २०० हेक्टर क्षेत्रावर ते यशस्वी होऊ शकले.
यंदाच्या खरिपात कापसाच्या पिकाचे क्षेत्र मागील वर्षीपेक्षा १० हजार हेक्टरने वाढविण्यात आले आहे. गतवर्षी २ लाख २५ हजार हेक्टर क्षेत्रावर नियोजन करण्यात आले होते. मात्र नियोजनापेक्षा जास्त १० हजार हेक्टरवर कपाशीची लागवड झाली. शेतकऱ्यांचा कल लक्षात घेऊन यंदा हे क्षेत्र वाढविण्यात आले आहे.

उसाच्या खरिपाचे नियोजन मागील वर्षीएवढेच ३०० हेक्टर ठेवण्यात आले आहे. गतवर्षी उसासाठी अधिक क्षेत्रफळ गृहीत धरले असले तरी १ हजार ९०० हेक्टरवरच शेतकऱ्यांनी उसाची लागवड केली.


९२ हजार क्विंटलवर बियाणे लागणार
यंदाच्या खरिपासाठी जिल्ह्यात ९२ हजार ५६४.३० क्विंटल बियाण्यांची आवश्यक्ता भासणार आहे. महाबीजच्या ३३ हजार ४१३ बियाण्यांची मागणी होणार असून या बियाण्यांमध्ये यंदा जवळपास ३ हजार क्विंटलने वाढ करण्यात आली आहे. खासगी बियाण्यांचे गतवर्षीचे नियोजन ६५ हजारांवरून ५६ हजार १५१.३० क्विंटलवर करण्यात आले आहे.
 

 

Web Title: planning of crops on 5 lakh 100 hectares this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती