नागपूरनजीक सिंदी येथे मेट्रो कोचचा प्लँट; लवकरच प्रकल्प अहवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 01:20 AM2018-11-23T01:20:09+5:302018-11-23T01:21:48+5:30
महामेट्रोतर्फे वर्धा जिल्ह्यातील सिंदी रेल्वे ड्राय पोर्ट येथे मेट्रो कोच प्लँट उभारला जाणार आहे. याबाबतचा विस्तृत प्रकल्प अहवाल बनविला जात आहे. या प्रकल्पासाठी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट यांच्याकडे ५० एकर जागेची मागणी केली आहे. पुणे मेट्रोसाठी सिंदी रेल्वे येथे मेट्रो कोच तयार क रण्यात येणार आहे. या प्रकल्प अहवालाचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती महामेट्रोचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर (रोलींग स्टॉक) जनककुमार गर्ग यांनी गुुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महामेट्रोतर्फे वर्धा जिल्ह्यातील सिंदी रेल्वे ड्राय पोर्ट येथे मेट्रो कोच प्लँट उभारला जाणार आहे. याबाबतचा विस्तृत प्रकल्प अहवाल बनविला जात आहे. या प्रकल्पासाठी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट यांच्याकडे ५० एकर जागेची मागणी केली आहे. पुणे मेट्रोसाठी सिंदी रेल्वे येथे मेट्रो कोच तयार क रण्यात येणार आहे. या प्रकल्प अहवालाचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती महामेट्रोचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर (रोलींग स्टॉक) जनककुमार गर्ग यांनी गुुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
या प्रकल्पासाठी चीनच्या दालियन प्रकल्पातून नागपूरसाठी पहिली मेट्रो रेल्वे रवाना करण्यात आली. याची माहिती देताना गर्ग म्हणाले, पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी ३ कोचच्या ३४ रेल्वेची गरज आहे. यातील केवळ २५ टक्के रेल्वे कोच महामेट्रोतर्फे सीआरआरसीच्या माध्यमातून चीनच्या दालिया प्रकल्पात बनविले जातील. उर्वरित ७५ टक्के रेल्वे कोच भारतात निर्माण करण्यात येतील. यासाठी महामट्रोने निविदा काढली आहे. सिंदी रेल्वे येथे खासगी सहभागातून मेट्रो कोच प्रकल्प उभारला जाणार आहे. हा केंद्र व राज्य सरकारचा संयुक्त उपक्रम असेल.
गर्ग म्हणाले, या प्रकल्पासाठी ४०० कोटीचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. तीन टप्प्यात हा प्रकल्प उभारला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात २५० कोटी खर्च होईल. सिंदी रेल्वे प्लँटमुळे देशात मेट्रो कोच बनविण्याच्या कामाला गती मिळणार आहे. यावेळी महामेट्रोचे महाप्रबंधक अनिल कोकाटे, डीजीएम(सीसी) अखिलेश हळवे उपस्थित होते.
प्रकल्पाच्या ठळक बाबी
- ४०० कोटींचा मेट्रो कोच प्रकल्प
- महामेट्रो केंद्र व राज्य सरकारचा उपक्रम
- पुणेसाटी मेट्रो कोच निर्माण करणार
- जेएनपीटी यांच्याकडे ५० एकर जागेची मागणी