बुद्ध पार्कमध्ये वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:13 AM2021-09-05T04:13:34+5:302021-09-05T04:13:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा पडला. त्यातून धडा घेत महापालिकेने नैसर्गिक ऑक्सिजनची मात्रा वाढविण्याचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा पडला. त्यातून धडा घेत महापालिकेने नैसर्गिक ऑक्सिजनची मात्रा वाढविण्याचा संकल्प केला आहे. यातूनच आसीनगर झोनअंतर्गत असलेल्या बुद्धनगरातील बुद्ध पार्क येथे शनिवारी वृक्षारोपण करण्यात आले.
शहरातील विविध भागातील खुल्या मैदानांवर किमान २५० झाडे लावून ऑक्सिजन पार्क उभारण्याच्या संकल्पनेला प्रतिसाद मिळत आहे. ऑक्सिजन झोन ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन महापौर दयाशंकर तिवारी यांनी बुद्ध पार्क येथे वृक्षारोपणप्रसंगी केले. आसीनगर झोनच्या सभापती वंदना चांदेकर, नगरसेवक मोहम्मद जमाल, संदीप सहारे, मंगला लांजेवार, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, उद्यान निरीक्षक अनंत नागमोते उपस्थित होते. उपस्थित नागरिकांनीही वृक्षारोपण केले. येथे ३०० झाडे लावणार असल्याचे सभापती वंदना चांदेकर यांनी सांगितले.