पर्यावरण रक्षणासाठी पोलीस मुख्यालयात वृक्षारोपण ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:08 AM2021-07-16T04:08:16+5:302021-07-16T04:08:16+5:30
पोलीस मुख्यालय नागपूर शहर येथे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार विकास ठाकरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते सचिन ...
पोलीस मुख्यालय नागपूर शहर येथे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार विकास ठाकरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते सचिन शर्मा, राखीव पोलीस निरीक्षक विजयप्रतापसिंह परिहार उपस्थित होते. कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी झाडे लावा झाडे जगवाचा नारा देऊन वृक्षारोपणाला सुरुवात केली. राखीव पोलीस निरीक्षक परिहार यांनी पोलीस मुख्यालयाला हिरवेगार करण्याचा संकल्प केला असून त्यांना आपले नेहमीच सहकार्य राहील, असे आमदार विकास ठाकरे यांनी सांगितले. यावेळी पोलीस अधिकारी, अंमलदारांसोबत नागरिकांनीही सहभागी होऊन वृक्षारोपण केले. आमदार विकास ठाकरे यांनी पोलीस मुख्यालय परिसरातील समस्या सोडविण्यासाठी तसेच पोलीस हॉस्पिटलसाठी २५ लाखाचा निधी उपलब्ध करून दिला. तसेच एमआयटी हॉल ते बीडीडीएस कार्यालयापर्यंतच्या रस्त्याचे काम, वसाहतीत जाणाऱ्या रस्त्याची डागडुजी व डांबरीकरण करण्यात आले. वृक्षांची देखभाल करण्यासाठी भंगारात पडून असलेल्या वस्तूंपासून १०० ट्री गार्ड तयार करण्यात आले.
..............