माेहगाव येथे ३०० राेपट्यांची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:08 AM2021-07-27T04:08:40+5:302021-07-27T04:08:40+5:30
धामणा : ग्रामपंचायत कार्यालय धामणा व महाकाली देवस्थान धामणा यांच्या संयुक्त विद्यमाने माेहगाव (खुर्द) येथे कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले ...
धामणा : ग्रामपंचायत कार्यालय धामणा व महाकाली देवस्थान धामणा यांच्या संयुक्त विद्यमाने माेहगाव (खुर्द) येथे कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी गावातील बालविद्या, व्यायाम शाळा व शासकीय दवाखान्याच्या आवारात विविध जातींच्या ३०० राेपट्यांची लागवड करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सभापती भारती पाटील, पंचायत समिती सभापती सुरेखा वरठी, नाना गावंडे, पंचायत समिती सदस्य अविनाश पारधी, सरपंच वंदना थुटूरकर, उपसरपंच मनोहर येलेकर, भीमराव कडू उपस्थित हाेते. ज्येष्ठ नागरिक बळवंत चौधरी, धनराज पारधी, मधुकर वासेकर व सकुबाई टोंगे यांचा अतिथींच्या हस्ते गाैरव करण्यात आला. खैरी येथील विकास कामांची पायाभरणीही करण्यात आली. कार्यक्रमाला भुयारीचे सरपंच गौरीशंकर गजभिये, उपसरपंच माणिक आदमने, प्रा. नंदेश तागडे, राजेंद्र चौधरी, भीमराव वाईकर, तुषार कोहळे, नंदा पाटनकर, विजय थुटूरकर, सुनंदा सातपुते, सुनील जोशी, राजू पारधी, अंकुश शेंडे, अनिल बावणे, दिनकर वाईकर, राहुल बारसे, दादाराव थुटूरकर, विष्णू आदमने, मनीषा देशभ्रतार, भोजराज सरोदे यांच्यासह महाकाली देवस्थान कमिटीचे सदस्य, ग्रामपंचायत सदस्य व नागरिक उपस्थित होते.