नगाजी महाराज मंदिर परिसरात वृक्षाराेपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:06 AM2021-07-12T04:06:59+5:302021-07-12T04:06:59+5:30

बुटीबाेरी : स्थानिक प्रभाग क्रमांक-६ मधील नगाजी महाराज मंदिरात रविवारी (दि. ११) कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी मंदिर ...

Planting trees in the vicinity of Nagaji Maharaj Temple | नगाजी महाराज मंदिर परिसरात वृक्षाराेपण

नगाजी महाराज मंदिर परिसरात वृक्षाराेपण

googlenewsNext

बुटीबाेरी : स्थानिक प्रभाग क्रमांक-६ मधील नगाजी महाराज मंदिरात रविवारी (दि. ११) कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी मंदिर परिसरात वृक्षाराेपण करण्यात आले. शिवाय, वृक्ष संवर्धनाची जबाबदारी स्वीकारण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवराव डोईफोडे तर प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष बबलू गौतम, पालिकेचे उपाध्यक्ष अविनाश गुजर, मंडळ अध्यक्ष आकाश वानखेडे, सभापती सर्वश्री मुन्ना जयस्वाल, विनोद लोहकरे, मंदार वानखेडे, अनिल बावला, संध्या आंबटकर, नगरसेवक प्रवीण शर्मा, प्रशांत डावले, नगरसेविका सुनिता जेऊरकर उपस्थित हाेते. या कार्यक्रमाचे आयाेजन ब्युटी पार्लर महिला समिती, गुरुदेव सेवा मंडळ तसेच प्रभाग-६ मधील लाेकप्रतिनिधींच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. प्रत्येकाने त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी किमान एक झाड लावून त्याचे याेग्य संगाेपन व रक्षण करण्याचे आवाहन नगराध्यक्ष बबलू गाैतम यांनी केले. आकाश वानखेडे व प्रवीण शर्मा यांनी झाडांचे सर्वांगीण महत्त्व समजावून सांगितले. मुन्ना जयस्वाल यांनी कार्यक्रमाच्या आयाेजनाचा उद्देश स्पष्ट केला. यशस्वितेसाठी रामदास राऊत, राजू खंते, प्रशांत सातपैसे, आशिष खंते, अतुल देशमुख, शुभम पोहाणे, अतुल देशमुख, सचिन लोखंडे, अमित वैद्य, सचिन खंते, विनोद मानकर, सुशील गुप्ता, मनोज सुरडकर, गोविंद खडसे, शंकर डाकोरे, शरद कबाडे, धनराज मोडक, सुनील विश्वकर्मा यांनी सहकार्य केले.

110721\img_20210711_184001.jpg

बुटीबोरी प्रभाग क्रमांक सहा येथे वृक्षारोपण करतांना नगराध्यक्ष बबलू गौतम,मंडळ अध्यक्ष आकाश वानखेडे,नियोजन सभापती मुन्ना जयस्वाल व मान्यवर.

Web Title: Planting trees in the vicinity of Nagaji Maharaj Temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.