विदर्भातील प्रतिभावंत कलावंतांसाठी व्यासपीठ ‘व्हाईस आॅफ विदर्भ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 09:53 PM2018-07-18T21:53:43+5:302018-07-18T21:54:45+5:30

नागपूर महापालिका व लकी इव्हेन्टस अ‍ॅण्ड म्युझिकल एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने एक्सेल इव्हेंटस सोल्युशन्स अ‍ॅन्ड सर्व्हिसेस यांच्या सहकार्याने कविवर्य सुरेश भट यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विदर्भातील प्रतिभावंत गायक कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘व्हाईस आॅफ विदर्भ’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेची महाअंतिम फेरी ४ आॅगस्टला होणार असून, येत्या २१ व २२ जुलैला स्पर्धेची प्राथमिक फेरी घेण्यात येणार असल्याची माहिती क्रीडा सभापती नागेश सहारे यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली.

A platform for talented artists from Vidarbha, 'Voice of the Vidarbha' | विदर्भातील प्रतिभावंत कलावंतांसाठी व्यासपीठ ‘व्हाईस आॅफ विदर्भ’

विदर्भातील प्रतिभावंत कलावंतांसाठी व्यासपीठ ‘व्हाईस आॅफ विदर्भ’

Next
ठळक मुद्देमहापालिका व लकी इव्हेन्टसतर्फे आयोजन : २१ व २२ जुलैला प्राथमिक फेरी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर महापालिका व लकी इव्हेन्टस अ‍ॅण्ड म्युझिकल एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने एक्सेल इव्हेंटस सोल्युशन्स अ‍ॅन्ड सर्व्हिसेस यांच्या सहकार्याने कविवर्य सुरेश भट यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विदर्भातील प्रतिभावंत गायक कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘व्हाईस आॅफ विदर्भ’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेची महाअंतिम फेरी ४ आॅगस्टला होणार असून, येत्या २१ व २२ जुलैला स्पर्धेची प्राथमिक फेरी घेण्यात येणार असल्याची माहिती क्रीडा सभापती नागेश सहारे यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली.
१४ वर्षांवरील व १४ वर्षांखालील अशा दोन वयोगटात ही स्पर्धा होणार असून, प्राथमिक फेरीमध्ये ज्येष्ठ गायक कलावंतांनाही सहभागी होता येणार आहे. उत्तर अंबाझरी मार्गावरील अमृत भवन येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत स्पर्धेची प्राथमिक फेरी होणार आहे. स्पर्धेच्या अंतिम फेरीत विजेत्या ठरणाऱ्या कलावंतांना २१,००० रुपये प्रथम, ११,००० रुपये द्वितीय व ७००० रुपये तृतीय, असे रोख बक्षीस प्रदान करण्यात येणार आहे.
स्पर्धेच्या माध्यमातून विदर्भातील उदयोन्मुख व प्रतिभावंत कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा स्पर्धेचा उद्देश आहे. यावर्षी क्रीडा स्पर्धांसह सांस्कृतिक स्पर्धांचेही आयोजन करण्यात येईल. गीत, गायन, अभिनय क्षेत्रातील कलावंतांना या माध्यमातून व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न असल्याचे नागेश सहारे यांनी सांगितले. स्पर्धेच्या आयोजनासाठी क्रीडा समिती सदस्यांसह लकी म्युझिकल ग्रुपचे संचालक लकी खान, विजय चिवंडे आदी सहकार्य करीत आहेत. स्पर्धेला मानव सुधार प्रन्यास संस्थेसह आदित्य-अनघा बँक आणि युनिक क्लिनिकच्या संचालिका डॉ. रिचा जैन यांचे सहकार्य लाभले आहे. सदर स्पर्धेत विदर्भातील उदयोन्मुख कलावंतांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. पत्रकार परिषदेला उपसभापती प्रमोद तभाने, नगरसेवक संजय चावरे, नगरसेविका सरला नायक, दर्शनी धवड उपस्थित होते.

Web Title: A platform for talented artists from Vidarbha, 'Voice of the Vidarbha'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.