नागपूर जिल्हा क्रीडा स्पर्धांमध्ये खेळाडू विद्यार्थ्यांचे अतोनात हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 11:58 AM2018-10-09T11:58:47+5:302018-10-09T12:02:06+5:30

जिल्हास्तरीय आंतरशालेय क्रीडा स्पर्धा मानकापूर क्रीडा संकुल परिसरात सुरू आहे. परंतु आयोजकांकडून स्पर्धकांना साध्या सोईसुविधा देखील पुरविण्यात आल्या नसल्याने विद्यार्थ्यांच्या जीवाची लाहीलाही होत आहे.

players suffers a lot in Nagpur District Sports Competition | नागपूर जिल्हा क्रीडा स्पर्धांमध्ये खेळाडू विद्यार्थ्यांचे अतोनात हाल

नागपूर जिल्हा क्रीडा स्पर्धांमध्ये खेळाडू विद्यार्थ्यांचे अतोनात हाल

Next
ठळक मुद्देक्रीडा स्पर्धांना सुविधांचा दुष्काळआॅक्टोबर हिटमध्ये विद्यार्थ्यांची लाहीलाहीना पाणी, ना शौचालय, विद्यार्थिनींची कुचंबणा

मंगेश व्यवहारे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे जिल्हास्तरीय आंतरशालेय क्रीडा स्पर्धा मानकापूर क्रीडा संकुल परिसरात सुरू आहे. क्रीडा क्षेत्रात आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी खेड्यापाड्यातून प्रवास करून खेळाडू विद्यार्थी येथे पोहचले आहे. आॅक्टोबर हिटच्या चटका सहन करत हे खेळाडू आपली गुणवत्ता सिद्ध करीत आहे. परंतु आयोजकांकडून स्पर्धकांना साध्या सोईसुविधा देखील पुरविण्यात आल्या नसल्याने विद्यार्थ्यांच्या जीवाची लाहीलाही होत आहे.
विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी शासनातर्फे या क्रीडा स्पर्धेचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. त्यासाठी शाळांना जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याकडे प्रति खेळाडू २५ रुपये असे शुल्क भरावे लागत असल्याची माहिती आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातून किमान ३०० च्या वर शाळांचे हजारो विद्यार्थी सहभागी होतात. गेल्या दोन दिवसांपासून मानकापूरच्या क्रीडा संकुलात या स्पर्धा सुरू आहे. शुक्रवारी ग्रामीण भागातील शाळांच्या स्पर्धा पार पडल्या. शनिवारी शहरी भागातील शाळांच्या स्पर्धा झाल्यात. लोकमतने या क्रीडा स्पर्धेची प्रत्यक्ष पाहणी केली. आॅक्टोबरची हिट चांगलीच तापत आहे. ग्रामीण भागातून १०० ते १५० किलोमीटरचा प्रवास करून खेळाडू सकाळी ८ पासून रिपोर्टिंग करीत होते. उन्हाचा पारा चांगलाच तापत असताना, खेळाडूंसाठी साधी सावलीची व्यवस्था सुद्धा आयोजकांना करता आली नाही. आपला परफॉर्मंमन्स दिल्यानंतर दम खात तळपत्या उन्हात खेळाडू बसले होते. ग्रामीणच्या स्पर्धा सुरू असताना पिण्याच्या पाण्याची सुद्धा सोय नव्हती. शिक्षकांनी तक्रारी केल्यानंतर कसेबसे पाणी पोहचले. पण तेही अपुरे. ना शौचालयाची सोय, ना विद्यार्थिनी खेळाडूंसाठी चेंिजंग रुमची सोय करण्यात आली होती. त्यामुळे चांगलीच कुचंबणा होत होती. या खेळाडूंसोबत आलेले शिक्षक, पालक यांना बसण्यासाठी साध्या खुर्च्या सुद्धा उपलब्ध नव्हत्या. सकाळी ८ ते सायंकाळी ६ पर्यंत विद्यार्थ्यांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागला. झाड्यांचा सावलीत विद्यार्थी, शिक्षक बसून होते.
एवढ्या भव्य स्पर्धा होत असताना प्रथमोपचाराची सोयसुद्धा नव्हती. उन्हाच्या तडाख्यात एखाद्याला भोवळ आली, आरोग्य बिघडल्यास रुग्णालयात भरती करण्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्सची सोयसुद्धा करण्यात आली नव्हती. सोईसुविधेचा अभाव असताना, आयोजकांच्या व्हॉलेंटीयरची दादागिरी सुद्धा भलतीच होती. त्यांच्याकडून असभ्य भाषेचा वापर होत असल्याच्या तक्रारी शिक्षकांनी केल्या. क्रीडा स्पर्धेच्या नावावर निव्वळ बोगसपणा दिसून आला.

क्रीडा स्पर्धेचा निधी जातो कुठे?
या स्पर्धेसाठी निधीची तरतूद करण्यात येत असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकाºयांनी सांगितले. शिवाय क्रीडा शुल्कापोटी शाळांना सुद्धा शुल्क भरावे लागते. असे असतानाही काहीच सोईसुविधा उपलब्ध होत नसतील तर हा निधी जातो कुठे?

चेंजिंग रुम उपलब्ध करून दिली, पण दूर होती
यासंदर्भात जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांना विचारणा केली असता, मैदान अंडर कन्स्ट्रक्शन आहे. सुविधा पुरविण्यासाठी क्रीडा स्पर्धेचे इनचार्ज योगेश खोब्रागडे यांना सूचना दिल्या होत्या. मुलींसाठी क्रीडा प्रबोधनी येथे चेंजिंग रुम उपलब्ध करून दिली होती, पण ती दूर होती.

Web Title: players suffers a lot in Nagpur District Sports Competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार