सावल्यांच्या खेळातून उलगडल्या वेदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 12:40 AM2018-01-16T00:40:28+5:302018-01-16T00:41:42+5:30

परदेशी राहणाऱ्या मुलांना भेटायला आतूर झालेल्या म्हाताऱ्या आईवडिलांची व्यथा, आमटीत पडलेल्या ओल्या सुंभासारखे, घुमसणारे हे असुखी-निसुखी जीव, उजेडाला दीपणारे पण अंधाराला ओळखी सांगणारे, मुलांच्या भेटीकरिता व्याकूळ असलेली आई सुलोचना आणि वास्तव्याचे भान असलेले वडील विनायक यांच्या आयुष्यातील या कृष्णधवल सावल्या अन् या सावल्यांमधून अभिव्यक्त होणाऱ्या वेदना नागपूरकर प्रेक्षकांनी अनुभवल्या. निमित्त होते महावितरणच्या आंतरपरिमंडलीय नाट्य स्पर्धेचे.

Playing of the Shadow, disclosed pain | सावल्यांच्या खेळातून उलगडल्या वेदना

सावल्यांच्या खेळातून उलगडल्या वेदना

Next
ठळक मुद्देदोन दिवसीय आयोजन : महावितरणच्या नाट्य स्पर्धेचे शानदार उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : परदेशी राहणाऱ्या मुलांना भेटायला आतूर झालेल्या म्हाताऱ्या आईवडिलांची व्यथा, आमटीत पडलेल्या ओल्या सुंभासारखे, घुमसणारे हे असुखी-निसुखी जीव, उजेडाला दीपणारे पण अंधाराला ओळखी सांगणारे, मुलांच्या भेटीकरिता व्याकूळ असलेली आई सुलोचना आणि वास्तव्याचे भान असलेले वडील विनायक यांच्या आयुष्यातील या कृष्णधवल सावल्या अन् या सावल्यांमधून अभिव्यक्त होणाऱ्या वेदना नागपूरकर प्रेक्षकांनी अनुभवल्या. निमित्त होते महावितरणच्या आंतरपरिमंडलीय नाट्य स्पर्धेचे. सोमवारी सायंटिफिक सभागृहात प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने या स्पर्धेचा प्रारंभ झाला. यावेळी महावितरणचे मुख्य अभियंते रफीक शेख, सुहास रंगारी, दिलीप घुगल, अरविंद भादीकर तसेच परीक्षक मधू जोशी, शोभना मोहरील, किशोर डाऊ यांच्यासोबतच महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) शरद दाहेदार, अधीक्षक अभियंते हरीश गजबे, सम्राट वाघमारे, उमेश शहारे, सुनील देशपांडे, दिलीप दोडके, मनीष वाठ, नारायण आमझरे, सुहास मेत्रे उपस्थित होते. उद्घाटनानंतर अमरावती परिमंडलाने ‘काही सावल्यांचे खेळ’ हे नाटक सादर केले. लेखक प्रसन्न शेंबेकर, दिग्दर्शक हेमराज ढोके होते. अभिजित सदावर्ती, वैशाली ठाकरे, विकास बांबल यांनी यात प्रमुख भूमिका साकारल्या. दुपारच्या सत्रात चंद्रपूर परिमंडलाने ‘अधांतर’ तर सायंकाळी अकोला परिमंडलाने ‘एक क्षण आयुष्याचा’ नाटक सादर केले. ‘अधांतर’ या नाटकात ८० च्या दशकातील मुंबईतील विस्कळीत जीवनाचे चित्र रंगविण्यात आले. या नाटकाचे लेखक जयंत पवार असून पंकज होनाडे यांनी दिग्दर्शन केले. स्नेहांजली तुंबडे, माधुरी सोनावणे, रोहिणी ठाकरे, शशांक डगवार. कृपाल लांजे, विवेक माटे, भालचंद्र घोडमारे, रवींद्र राऊन, नितीन पिंपळकर यांनी यात भूमिका साकारल्या. ‘एक क्षण आयुष्याचा’ या नाटकाने आजच्या भ्रष्टाचाराने पोखरून टाकलेल्या यंत्रणेविरुद्ध एल्गार पुकारला. चंद्रकांत शिंदे लिखित आणि नितीन नांदूरकर दिग्दर्शित या हृदयस्पर्शी नाट्याविष्काराचे सूत्रधार अरविंद भादीकर तर निर्मिती गुलाबराव कडाळे यांची होती.
उद्घाटनीय कार्यक्रमाचे प्रास्ताविक मेघा अमृते, संचालन आणि आभार मधुसूदन मराठे यांनी मानले.

Web Title: Playing of the Shadow, disclosed pain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.