सांगा ओझे कशाचे.... महागाईचे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:08 AM2021-09-13T04:08:12+5:302021-09-13T04:08:12+5:30
तेलही गेले तूपही गेले, हाती आले धुपाटणे... अशी म्हणण्याची वेळ सध्याच्या एकूणच आर्थिक विवंचनेवरून आली आहे. इंधनाचे दर तर ...
तेलही गेले तूपही गेले, हाती आले धुपाटणे... अशी म्हणण्याची वेळ सध्याच्या एकूणच आर्थिक विवंचनेवरून आली आहे. इंधनाचे दर तर वाढले आहेत. मग, खाद्यतेल कसे मागे राहणार? तब्बल ५५ टक्के दरवाढ खाद्यतेलामध्ये झाली आहे. महागाईने आधीच बजेट कोलमडले आहे. त्यात सणासुदीला करावा लागणारा खर्च डोईजड होतोय. अशात छायाचित्रकाराने टिपलेले हे चित्र बोलके आहे. हा वृद्ध खाद्यतेलाचे पिंप विकून उदरनिर्वाह चालवतो. जेथे खाद्यतेल परवडेनासे झाले आहे, तेथे लोक पिंप घेण्याचे टाळून एक किलो, अर्धा किलो तेल घेऊन जीवन चालवत आहेत. मग, या वृद्धाला रिकामे पिंप तरी कसे मिळणार हा सवाल आहे. म्हणून ओझे कशाचे, हा प्रश्न पडतो.
- छायाचित्र - मुकेश कुकडे
..........