नागपूर मनपातील कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 10:58 PM2018-11-19T22:58:09+5:302018-11-19T22:59:17+5:30
देशाच्या एकतेसाठी व अखंडतेसाठी लढा देण्याऱ्या भारताच्या प्रथम महिला पंतप्रधान भारतरत्न स्व.इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त महापालिका मुख्यालयात आयोजित कार्यक्र मात उपस्थितांनी इंदिरा गांधींच्या तैलचित्राला माल्यार्पण करून आदरांजली दिली. महापौर नंदा जिचकार यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशाच्या एकतेसाठी व अखंडतेसाठी लढा देण्याऱ्या भारताच्या प्रथम महिला पंतप्रधान भारतरत्न स्व.इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त महापालिका मुख्यालयात आयोजित कार्यक्र मात उपस्थितांनी इंदिरा गांधींच्या तैलचित्राला माल्यार्पण करून आदरांजली दिली. महापौर नंदा जिचकार यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.
यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती वीरेन्द्र कुकरेजा, विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, महापालिका आयुक्त अभिजित बांगर, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, अझीझ शेख, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, निगम सचिव हरीश दुबे, सहायक आयुक्त महेश धामेचा व मिलिंद मेश्राम, कार्यकारी अभियंता (विकास)सोनाली चव्हाण, कार्यकारी अभियंता एस.बी.जैस्वाल, राजेश भुतकर, एम.जी.कुकरेजा, प्रदीप राजगीरे, मनोज गणवीर, राजेंद्र राहाटे, कर निर्धारक व संग्राहक डी.एम.उमरेडकर, प्रमुख अग्निशमक अधिकारी राजेन्द्र उचके, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, अविनाश बारहाते, आर.एस.कांबळे, ग्रंथालय अधीक्षक अल्का गावंडे, बाजार अधीक्षक वैद्य यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, शाखा प्रमुख व अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी केले.