प्रत्येक क्षेत्रात विकासाच्या भरपूर संधी ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:06 AM2021-07-01T04:06:35+5:302021-07-01T04:06:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : देशातील प्रत्येक क्षेत्रात विकासाच्या आणि प्रगतीच्या भरपूर संधी आहेत. तसेच क्षमताही खूप आहेत. गरज ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशातील प्रत्येक क्षेत्रात विकासाच्या आणि प्रगतीच्या भरपूर संधी आहेत. तसेच क्षमताही खूप आहेत. गरज आहे ती दूरदृष्टीची. उद्यमशीलता निर्माण झाली तर ते शक्य होईल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
डॉ. गाडगीळ स्मृती व्याख्यानाअंतर्गत ते आभासी कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाला उद्योगमंत्री सुभाष देसाई, सुधीर मेहता, डॉ. राजीव पोतदार, मीनल मोहाडीकर, दीपक नाईक, नंदकिशोर कासलीवाल, विठ्ठल कामत, आदी उपस्थित होते. गडकरी म्हणाले, कृषी क्षेत्रातील समस्यांची धनंजयरावांना जाण होती. या समस्या सहकाराच्या माध्यमातून सोडविण्याचा त्यांनी यशस्वीपणे प्रयत्न केला. आज कृषी विकासाला प्राधान्य देण्याची गरज आहे. कारण कृषी क्षेत्र हे अनेक समस्यांचा सामना करीत असून त्याची तुलना अन्य क्षेत्रांशी करता येत नाही. उत्पादन क्षेत्रही अधिक महत्त्वाचे आहे; कारण या क्षेत्रामुळे अधिकाधिक रोजगार निर्मिती होऊ शकते, असेही ते म्हणाले.