पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा गाैरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:07 AM2021-07-03T04:07:18+5:302021-07-03T04:07:18+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : तालुका कृषी विभागाच्या वतीने रबी हंगामात गहू व हरभरा या पिकांची स्पर्धा घेण्यात आली ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : तालुका कृषी विभागाच्या वतीने रबी हंगामात गहू व हरभरा या पिकांची स्पर्धा घेण्यात आली हाेती. कृषी दिनानिमित्त कळमेश्वर येथे आयाेजित या स्पर्धेचे निकाल जाहीर करण्यात आले असून, यातील विजेत्या शेतकऱ्यांचा गाैरव करण्यात आला. शिवाय, पंचायत समितीच्या आवारात वृक्षाराेपणही करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन कृषी उपसंचालक (खते) अजय कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय कृषी अधिकारी विजय निमजे, तालुका कृषी अधिकारी उमाकांत हातांगळे, खंडविकास अधिकारी महेश्वर डोंगरे, सहायक गटविकास अधिकारी संदीप गोडशलवार, कृषी अधिकारी प्रदीप टिंगरे, विस्तार अधिकारी नंदकिशोर खंडाळ उपस्थित होते.
रबी हंगाम सन २०२०-२१ तालुकास्तरीय पीक स्पर्धेतील हरभरा गटात साकेत बंड, रा. कन्याडाेल यांनी प्रथम, कमलाकर राऊत, रा. झुनकी यांनी द्वितीय आणि अनिल धुंदे, रा. परसोडी यांनी तृतीय क्रमांक पटकावला. त्यामुळे या तिन्ही विजेत्या शेतकऱ्यांसाेबतच प्रगतिशील शेतकरी सुधाकर कुबडे व सतीश मोहोड यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. संचालन कृषी अधिकारी दीपक जंगले यांनी केले तर मोरेश्वर तांबेकर यांनी आभार मानले.